भारतातील पहिल्या मॉडेल जी -२० शिखर परिषदेत ऍड. प्रबोधन निकाळजे व ऍड. विश्वेश अनारसे यांचा सहभाग

 भारतातील पहिल्या मॉडेल जी -२० शिखर परिषदेत ऍड. प्रबोधन निकाळजे व ऍड. विश्वेश अनारसे यांचा सहभाग




आष्टी प्रतिनिधी: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व इंडियन इन्स्टिटयूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप द्वारे 30 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या भारतातील पहिल्या मॉडेल G20 शिखर परिषदेत आष्टी येथील युवा अधिवक्ता ऍड. प्रबोधन निकाळजे व ऍड. विश्वेश अनारसे यांनी सहभाग घेतला व फायनान्स ट्रॅक (F20) मधे आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीचे लोकशाहीकरण या थीम ला अनुसरून आपले मत मांडले व चर्चा केली. या परिषदेमध्ये भारतातील 16 राज्यातील 160 युकांचा सहभाग होता.


जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे, ज्या मधे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली वसुदैव कुटुंबकम "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" ही थीम मांडली आहे.  जी-20 सदस्य राष्ट्र आणि विशेष निमंत्रित राष्ट्रांमधील चर्चा आणि वादविवादचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या 85% भागावर परिणाम होणार आहे. या वर्षी या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने सर्व जग या कडे सकारात्मक दृष्टीने पहात आहे. 


इंडोनेशियाचे मंत्री समुपदेशक मा.  श्री यको जुनोर, सिंगापूरचे कौन्सुलेट जनरल मा.  श्री सियोंग मिंग फुंग, नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि G20 भारतीय शेर्पा मा. अमिताभ कांत, राज्यसभा सदस्य व रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष मा.  श्री विनय जी सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक डॉ . जयंत कुलकर्णी, आणि आयआयडीएलचे संचालक मा.  श्री देवेंद्र पायी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अद्वितीय कार्यक्रम पार पडला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.