प्रत्येक जण समाजाचे काहीतरी देणे लागतोच.... डॉ.अरविंद झेंडे.

 प्रत्येक जण समाजाचे काहीतरी देणे लागतोच....
डॉ.अरविंद झेंडे.







प्रतिनिधी : संजय पंडित


दि.१९ पर्वती (पुणे) : ज्या समाजात आपण जन्मलो,वाढलोत्या समाजाचे आपल्या जडणघडणीत खुप मोठे योगदान असते,या योगदानाची परतफेड प्रत्येकाने आपल्या परीने करायलाच हवी, तरच आपण या सामाजिक ऋणातून उतराई होऊ शकतो असे प्रेरणादायी आवाहन प्रख्यात आयुर्वेदाचार्य तथा जेष्ठ समाजसेवक डॉ.अरविंद झेंडे यांनी केले आहे.

रविवार दि.१९ फेब्रुवारी रोजी पुण्यातील पर्वती जवळील जनता वसाहतीतील अंगणवाडीत सहयोग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.झेंडे बोलत होते.

याच कार्यक्रमात सहयोग फाऊंडेशनच्या वतीने दीडशे मुलांना सुवर्णप्राशन,बुध्दी स्मृतीवर्धन,तथा  लहान मुलांच्या साथीच्या आजाराची औषधे मोफत वाटण्यात आली.

तसेच डॉ.झेंडे यांनी मुलांच्या मातांना सुदृढ जीवनासाठी आयुर्वेद आणि योगाभ्यासाचे धडे आणि याच दिले.

सहयोग फाऊंडेशन गेली पाच वर्ष  वारंवार अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजातील जास्तीतजास्त दुर्बल घटकांना मूलभूत सेवा देण्याचे कार्य अविरत करीत आहे.

संस्थेचे जेष्ठ विश्वस्त रामदास सैदाणे आणि डॉ.झेंडे हे दोघेही याच वस्तीतून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून लहानसे मोठे झाले आहेत.याच वसाहतीत हात रुमाल,टोप्या, अंडा बुर्जी विकून तथा पहाटे घरोघरी दूध टाकून या दोन्ही समाजसेवकांची जडणघडण झालेली आहे.दोन्हीही मान्यवर समाजसेवक आज उच्य पदावर कार्यरत असून सतत समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सामाजिक तळमळीच्या कार्याने प्रभावित असलेल्या दोन्ही समाजसेवकानी आपले जीवन समाजकार्याला वाहून घेतलेले आहे.

ज्या परिस्थितीतून आपण आलो,त्या परिस्थितीत आजही जीवन जगणाऱ्या आपल्या बांधवांना आणि त्यांच्या लहान मुलांना सुध्धा सर्व साधारण आयुष्य जगायला मिळायला हवं,

त्यांना सुध्दा निरोगी आयुष्य आणि योग्य शिक्षण मिळून चांगली जडणघडण करता यावी,या दृष्टिकोनातून या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहयोगचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव शिंदे,अध्यक्ष बेबीताई कऱ्हेकर,खजिनदार अरुण कालेकर तथा विश्वस्त क्षीरसागर साहेब,गोरे साहेब, बाळकृष्ण भामरे,कैलास सोनवणे आदी मान्यवरांनी यावेळी विशेष सहकार्य केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.