स्वाभिमानाचा आणि आत्मसिश्वासाचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज - खासदार राहुल शेवाळे

 स्वाभिमानाचा आणि आत्मसिश्वासाचा हुंकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज - खासदार राहुल शेवाळे





मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चेंबूर येथील आर सी एफ कर्मचारी  संघ (बी एम एस ) या कामगार संघटनेच्या वतीने सिंहगड किल्ला ते चेंबूर अशी शिवज्योत आणण्यात आलीशिवज्योतीच्या आगमनाच्या प्रसंगी आर सी एफ चे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर,सुभेदार नरवीर तानाजी - सूर्याजी मालुसरे यांचे पोलादपूर तालुक्यातील वंशज रवींद्र मालुसरेखासदार राहुल शेवाळेआर सी एफ कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष संजय उपाध्यायकार्याध्यक्ष राजेश सिंगनगरसेवक महादेव शिवगणमाजी नगरसेविका श्रीमती निर्मला सिंगमाजी नगरसेविका राजेश्री पालांडे यांच्यासह  विविध संघटनांचे अनेक पदाधिकारीकार्यकर्तेस्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतेरवींद्र मालुसरे यांचा यावेळी शालपगडीसन्मानचिन्ह प्रदान करून खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

खासदार राहुल शेवाळे म्हणालेमी माझ्या मनगटाच्या बळावर स्वतंत्र राज्य मिळवून रयतेचा राजा होणारहा स्वाभिमानाचाआत्मसिश्वासाचा हुंकार त्यापूर्वी तीनशे वर्षे महाराष्ट्र भूमीवर उमटला नव्हता तो शिवाजी महाराजांच्या रूपाने प्रगट झाला.स्वराज्य स्थापन केले आणि ते सुराज्य कसे होईल याकरता ते सतत प्रयत्नशील राहिलेशिवाजी राजांचे कार्य हे आपले आहे असे त्या वेळच्या मावळ्यांना आणि रयतेला वाटत होते त्यामुळे नरवीर तानाजीबाजीशिवा काशीद यांनी लढताना आत्मसमर्पण केलेशिवाजी महाराज हे वारसा हक्काने राजे बनले नव्हते ते त्यांनी स्वतः एक राज्य निर्माण केलेत्यामुळे ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या राष्ट्राचेच नेते होते.

यावेळी रवींद्र मालुसरे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासाचा मागोवा घेताना म्हणाले की,पुरंदरच्या तहानंतर राजांच्या कल्पनेतला भूगोल बिघडला होतापरंतु तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याच्या लढाईत महापराक्रम केलास्वतः धारातीर्थी पडले गड जिंकला आणि  त्या इर्षेतून पुढेमावळ्यांनी गेलेले सर्व किल्ले पुन्हा जिंकलेआणि छत्रपतींचा राज्याभिषेक झालामहाराजांचा हा इतिहास कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलांना सांगितला पाहिजेमराठीतून त्यांना वाचायची सवय लावली पाहिजेअन्यथा आपण शिवाजी महाराज की आणि मुले फक्त 'जयम्हणतील.

कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी संदीप कदम यांनी या उपक्रमाचे नियोजन केलेआर सी एफ महिला मंचच्या वतीने पारंपरिक वेषभूषेसह लेझीम नृत्य करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवलेसूत्रसंचालन शिवप्रसाद कांबळे यांनी केले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.