छत्रपतींना मानाचा मुजरा
🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवशाहीची ओळख
मराठी मुलुख
अंतरीचे बोल
कष्टाचे मोल
मैदानी तोफ
क्रांतीचे रोप
दरवाजा बुलंद
गुलामगिरीला पायबंद
म्हणजे राजे शिवछत्रपती
फौलादी साखळदंड
मोंगलाविरूद्ध बंड
हिमालयातून उंच
निष्ठावंतांना संच
भगवा यलगार
स्वातंत्रयाचा दरबार
हिंन्दूस्तानचा प्राण
भगव्याची शान
महाराष्ट्राचा पहिला मान
या मातीची शान
म्हणजे राजे शिवछत्रपती
दौलतीचा धूरकरी
जन्मताच शिवनेरी
स्वराज्याची मुहूर्तमेढ
मानबिंदू रायगड
अभंगाचि जिव्हाळा
डोंगरमाथ्याचा पन्हाळा
जागतिक किर्ती चे धुरंधर
प्रौढप्रताप पुरंदर
सत्संगाचा मार्ग
आणि विजयी सिंधुदुर्ग
म्हणजे राजे शिवछत्रपती
संस्काराचा धडा
आणि सह्याद्रीचा कडा
पाठीवर ची ढाल
अज्यिंक तलवार
समर्थक खंदा
लाखोंचा पोशिंदा
रणमर्द मराठा
आणि आठवणींचा साठा
गनिमी काव्यात माहिर
आणि शब्दांचे शाहिर
म्हणजे राजे शिवछत्रपती
मांगल्याची स्वप्नपूर्ती
देव्हाऱ्यातील मुर्ती
अन्यायाविरुद्ध आग
जातिवंत वाघ
संकटाना बळ देणारा भास
जगात एकमेव खरा इतिहास
धमन्यात रक्त
आणि दिल्लीचे तख्त
यश किर्तीचा भक्त
राजा एकटे फक्त
म्हणजे राजे शिवछत्रपती
राजाधिराज
श्रीमंत श्रीमान योगी
सर्व सुखाचे त्यागी
भूपती,जलपती,गढपती
गजपती,अश्वपती
रयतेचे प्रजापती
राजे शिवछत्रपती
राजे शिवछत्रपती
सह्याद्रीकन्या
डॉ शीतल शिवराज मालूसरे
(सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजा)
महाड-रायगड
stay connected