जि.प.कें.प्रा.शाळा रुईनालकोल येथे वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न , चिमुकल्यांनी जिंकली सर्वांची मने

 जि.प.कें.प्रा.शाळा रुईनालकोल येथे वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न , चिमुकल्यांनी जिंकली सर्वांची मने



आष्टी प्रतिनिधी 

 

 आष्टी तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शाळा रुई नालकोल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला , शाळेतील लहान मुलांच्या नृत्याने सर्वांची मने जिंकली . 

  गावक-यांनी या चिमुकल्याचे मन भरून कौतुक करत तब्बल 75 हजार रु.देणगीस्वरुपात शाळेला बक्षीस दिले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री यादव साहेब व केंद्रप्रमुख श्री शेंडगे सर हे होते. गावचे सरपंच,उपसरपंच,से.स. सो. चेअरमन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य, पालक,गावातील सर्व युवा वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते .

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री देविदास गांजुरे, शिक्षिका श्रीमती झगडे मॅडम व श्रीमती नेटके मॅडम यांनी खूप सहकार्य केले .  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सतीश शिंदे सर व परमेश्वर गांजुरे सर यांनी केले तर आभार श्रीमती झगडे मॅडम यांनी मानले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.