आष्टी ते साबलखेड हा रस्ता मंजुर होऊन सुध्दा सुरु होण्याची लक्षणे दिसत नाहीत .

 आष्टी ते साबलखेड हा रस्ता मंजुर होऊन सुध्दा सुरु होण्याची लक्षणे दिसत नाहीत .



अनिल मोरे/कडा






आष्टी तालुक्यातील आष्टी ते साबलखेड हा रस्ता मंजुर होऊन सुध्दा सुरु झाला नाही यांचे कारण काय ? असा सवाल जनता करत आहे.

रस्त्याच्या कडेला किती झाडे आहे किती विद्युत पोल आहे याचा सर्वे सुद्धा झाला मोजणी झाली .

रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार अशी जनतेतुन चर्चा सुरु असताना विद्युत पोलच्या तारा ओढणे सुरू झाले असून  रस्ता होणार की नाही हि चर्चा जनतेतुन ऐकू येत आहे .

त्यामुळे आष्टी ते साबलखेड हा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला तो फक्त कागदोपत्री का या रस्त्याचे टेंडर असुन किती दिवस लागणार हा रस्ता सुरुवात करण्यास .

हा रस्ता किती प्रवाशांचे प्राण घेणार रहदारीला सुध्दां मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत अवकाळी पाऊस झाला कि कड्याच्या जुन्या बसस्टॉपवर भले मोठे खड्डे पडले असल्यामुळे त्या खड्ड्यामध्ये पाउसाचे पाणी साचले की वाहनधारकांना त्या खड्ड्याचा अंदाज येत नाही व आपघात होत राहतात.

त्यामुळे शासनाने या रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी जनता करत आहे.

रस्त्याच्या लगतची झाडे विद्युत पोल अडचणीचे ठरत आहे विद्युत पोलच्या तारा टाकळी आमिया फाटा ते जुने बस स्थानक पर्यंत तारा ओढण्यात आल्या होत्या परंतु काही महीने उलटले  कारण विद्युत पोल काढण्यात येणार होते . त्यावर रस्ता मोजुन नंबर सुद्धा टाकण्यात आले होते . परंतु सध्या विद्युत पोलच्या तारा ओढण्याचे काम प्रगती पथावर चालु आहे . रस्ता होणार की नाही अशी चर्चा जनतेतून होत आहे  राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.