चुलीवर चहा करताना भाजून ९० वर्षीय वृद्धेचा मृत्यू.

 चुलीवर चहा करताना भाजून ९० वर्षीय वृद्धेचा मृत्यू.



केज : : केज तालुक्यातील टाकळी येथे चुलीवर चहा करताना भाजल्याने एका वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी केज पोलिस स्‍टेशनमध्ये आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.


या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील टाकळी येथे सरुबाई विश्वनाथ बारगजे (वय ९०) या चुलीवर चहा बनवीत होत्‍या. यावेळी त्‍यांच्या लुगड्याचा पदर चुलीतील जाळावर पडल्‍याने त्याने पेट घेतला. त्यात त्‍या गंभीर भाजल्‍या गेल्‍या. त्‍यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्‍यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी नितीन सुंदरराव बारगजे यांच्या माहितीवरून (दि. ३) रोजी केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूचा नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शेख हे पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.