अवैध वृक्षतोड बंद; मग आरा गिरणीवर कत्तल झालेली झाडे येतात कुठुन, सुरेश कांबळे

 अवैध वृक्षतोड बंद; मग आरा गिरणीवर कत्तल झालेली झाडे येतात कुठुन, सुरेश कांबळे




 धामणगाव प्रतिनिधी - पर्यावरणाचा समतोल राखला जावा,पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून झाडे लावा झाडे जगवा यासाठी दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा खर्च शासनस्तरावरून होत असतांना देखील बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात वृक्षतोड होत नसल्याचे संबंधित विभागाकडून बोलले जात आहे.मग आरा गिरण्यावर कत्तल झालेली झाडे येतात कुठुन असा प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून आरा गिरणीची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जनहित लोकशाही पार्टी बीड जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी केली आहे.

    आष्टी तालुक्यातील कडा, धामणगाव, चिंचपूर सह आष्टी शहरात अधिकृत आरा गिरणी आहेत  त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर व्यापारी देखील आहेत. ठराविक झाडे सोडता इतर झाडे तोडण्यास बंदी असताना देखील टॅक्टर, कटींग मशिन, मजुर दिमतीला घेऊन मोठ्या प्रमाणावर दररोज झाडांची कत्तल होत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.एकिकडे वृक्षतोड बंद असल्याचे बोलले जात असले तरी तालुक्यातील या आरा गिरण्यावर मोठमोठ्या झाडांची कत्तल करून तिथे येतात कशी हा संशोधनाचा विषय आहे तर हिच कत्तल केलेली झाडे विक्रीसाठी अहमदनगर जिल्ह्यात जात आहेत. टेम्पो, ट्रकच्या माध्यमातून याची तस्करी केली जात आहे. वनविभाकडुन आरा गिरण्यावर जाऊन पाहणी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी  सुरेश कांबळे यांनी केली आहे.

या ठिकाणी आहेत परवानाधारक आरा गिरणी

  आष्टी तालुक्यातील  चिचपुर १, कडा ३, धामणगांव १,आष्टी २ अशा एकुण ७ परवाना धारक आरा गिरण्या आहेत. 

तर होऊ शकतो गुन्हा दाखल 

 अवैध वृक्षतोड, वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा (N.C.) नोंदविला जात होता. मात्र याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.