महाआरोग्य फिल्म फेस्टिव्हलमध्ये तेजवार्ता च्या शॉर्ट फिल्मला मिळाले पारितोषीक
बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला पारितोषीक वितरण सोहळा
पुणे ( संदिप जाधव ) -
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे महाआरोग्य फिल्म फेस्टिवल 2023 चे आयोजन करण्यात आले होते . यात राज्यभरातुन 180 लघुपटांनी सहभाग घेतला होता . त्या सर्व लघूपटांचे परिक्षण आठ तज्ञ परिक्षकांनी केले . पैकी 20 लघूपटांची निवड करण्यात आली होती .या मध्ये बीड जिल्ह्यातील तेजवार्ता न्युज नेटवर्क अँण्ड फिल्म्स प्रॉडक्शन च्या एंड ऑफ लाईफ या टिवी स्पॉट शॉर्ट फिल्मला चतुर्थ पारितोषीक मिळाले . याचे पारितोषीक वितरण समारंभ पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर मध्ये शुक्रवार दि . 17 रोजी संपन्न झाले . तेजवार्ता चे संपादक तथा निर्माते दिग्दर्शक सय्यद बबलूभाई यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत , अभिनेते मोहन आगाशे , आरोग्य सेवा उपसंचालक डॉ . कैलास बाविस्कर , संचालक नितीन आंबेकर तसेच आयुक्त धिरज कुमार आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले . यावेळी उपसंपादक संदीप जाधव , कलाकार इरफान पठाण , अविनाश शेळके , शिवाजी सुरवसे , शेख हमजान हे उपस्थित होते .
या लघुपटात माजी सरपंच राजाभाऊ शेळके यांनी मुख्य भूमिका साकारली असून केवळ एक मिनीटात मोलाचा संदेश यातुन दिला आहे . एकही संवाद नसताना केवळ एक कलाकार घेऊन ही माईक्रो शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे .
याचे छायांकन हमजान शेख यांनी केले असुन संकलन सय्यद अमन यांनी केले आहे . निर्मीती सहाय्य सागर पंडागळे व राहुल आडकर यांनी केले आहे . तेजवार्ता फिल्म्स च्या सर्व टिम चे अभिनंदन पुणे येथील युवा उद्दोजक आजिनाथ देवकर , न्यायाधिश विष्णु गायकवाड , कामधेन उद्योग समुहाचे संचालक कांतीलाल चानोदिया , पत्रकार अनिल लगड , शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव सुरवसे तसेच मच्छिंद्र शेळके , महादेव अडागळे , परमेश्वर गायकवाड , जय चानोदिया, राजु शेख , शाहनवाज पठाण , महादेव काळे , अफसर पठाण , दादासाहेब उदावंत ,डॉ . देविदास मोरे , मुन्ना सय्यद आदींनी केले .
याप्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत म्हणाले कि जागरूक पालक सुदृढ बालक योजने अंतर्गत आगामी काळात शुन्य ते अठरा वर्षा खालील बालकांचे एकूण दोन कोटी ९२ लाख हेल्थ कार्ड तयार करणार व बालकांच्या आजाराचे सर्वेक्षण करून त्या सर्व बालकांवर शासन मोफत औषधोपचार करणार तसेच साडे बारा कोटी लोकांचे हेल्थ कार्ड करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरणार . महाराष्ट्राचे आरोग्य सक्षम व सुदृढ करण्यासाठी आरोग्य विभाग भारतात अग्रेसर राहिल . चित्रपट माध्यम हे जनजाग्रतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे आरोग्य राज्यमंत्री तान्हाजी सावंत म्हणाले .
यावेळी बोलताना अभिनेते मोहन आगासे म्हणाले या महाआरोग्य फिल्म फेस्टीवलच्या माध्यमातुन लपलेले सिनेमांचे दिग्दर्शक पुढे येतील . चित्रपट हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम असून समाजाला दिशा देत प्रगल्भ विचार या माध्यमातुन दिला जातो . या पारितोषीक वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातील अनेक निर्माते दिग्दर्शक व कलाकारांनी मोठ्या संखेने हजेरी लावली होती .
stay connected