*54 लाख प्रति तांदळातून साकारली शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती* *कलाशिक्षक नरेश लोहार यांचे विद्यार्थ्यांसमवेत शिवरायांना अनोखे अभिवादन*

 *54 लाख प्रति तांदळातून साकारली शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती* 

*कलाशिक्षक नरेश लोहार यांचे विद्यार्थ्यांसमवेत शिवरायांना अनोखे अभिवादन* 




अतुल जवने / देवळाली

भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रशाला ज्युनिअर कॉलेज व व्यवसाय शिक्षण, अमरापूर ता. कडेगाव जि. सांगली या विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तांदळाच्या माध्यमातून विद्यालयाचे उपक्रमशील  कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती  साकारली आहे .कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या समवेत विद्यालयातील इयत्ता सातवीच्या प्रियांका बडे,आर्या शिंदे,करिष्मा मुलाणी, तनुष्का शिंदे, श्रावणी मोरे ,संस्कृती यादव,श्रावणी पोळ,संचिता रुपनर,शौर्या कणसे,सिद्धी पवार,वैष्णवी खरात,सिद्धी तुपे या विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेतली आहे.  १७ बाय २५ फुट या साइजमधे ही प्रतिकृती अवघ्या 2 दिवसात  19 तासात पूर्ण केली आहे.तांदळाला अक्रालिक रंगाच्या माध्यमातून विविध रंगछटा देण्यात आल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे.स्वतःच्या कुटुंबाला  विसरून मायेने हात फिरावणारे व स्वराज्य मिळवण्यासाठी धडपडणारे ते छत्रपती शिवाजी महाराज होते.याच प्रेरणेतून शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा व प्रत्येक विद्यार्थ्यानी एक उत्तम कला जोपासवी अशी भावना कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी व्यक्त केली.विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे डी एम सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. ही प्रतिकृती साकारताना विद्यालयातील सर्व सेवकांचे विशेष सहकार्य मिळाले.  कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी दिनांक 6 डिसेम्बर  2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना साडे तीन हजार चौरस फुट या आकारांत 3221 वह्या पुस्तकांमधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिली प्रतिकृती साकारताना अनोखे अभिवादन देण्यात आले होते . या दुसऱ्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे व विद्यार्थ्यांचे विशेष  कौतुक होत असून विद्यार्थी व पालकांसाठी ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.