*आयसी आयसी आय फाउंडेशनच्या विविध 20 राज्यातील प्रतिनिधींची सुंबेवाडी गावास भेट.....!*
दि.४ फेब्रुवारी वार शनिवार रोजी आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी गावास आष्टी तालुक्याचे फाऊंडेशन चे तालुका विकास अधिकारी चेतन पाटोळे सर समन्वयक कांबळे सर यांच्यासह २० राज्यातील ३० प्रतिनिधींनी सुंबेवाडी गावास भेट दिली यावेळी त्यांनी गावातील झालेल्या विकास कामांची पाहणी केली.
फाउंडेशन मार्फत राबवण्यात आलेल्या गांडूळ खत बेड, नदी खोलीकरण व यावर्षी करावयाच्या पाझर तलावा दुरुस्ती कामाची पाहणी केली. फाउंडेशन मार्फत आत्तापर्यंत गावात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये शेळी पालन प्रशिक्षण, फळबाग प्रशिक्षण अशा अनेक प्रशिक्षणाचे शिबिर फाउंडेशन मार्फत घेण्यात आले आणखी यापुढेही बरेच काम करण्यात येणार आहेत असे अधिकारी चेतन पाटोळे सर यांनी सांगितले. यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आपल्या पारंपारिक पद्धतीने टोपी पंचा घालून करण्यात आले कार्यक्रमास सुंबेवाडी चे युवा सरपंच योगेश शेळके,उपसरपंच अशोक गागरे ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके छाया वाळके, अर्जुन शेंडगे बचत गटाचे अध्यक्ष रेखाताई पाचारणे, ग्रामपंचायत कर्मचारी मल्हारी खांदवे सुंबेवाडी ग्रामस्थ तरुण वर्ग उपस्थित होत्या आपल्या छोट्याशा गावाला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या २० राज्यातील ३० अधिकारी लोक येतात ही एक चांगले काम केल्याची पावती आहे असे सरपंच योगेश शेळके यांनी बोलतानी सांगितले.
stay connected