जय जय महाराष्ट्र माझा...

 जय जय महाराष्ट्र माझा...




जय जय महाराष्ट्र,माझा गर्जा महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा !!धृ!!
भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरी-दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र, माझा गर्जा महाराष्ट्र माझा !!१!!
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी 
पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी 
दारच्या उन्हात शिजला
निष्ठाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखीतो, महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा!!२!!

मराठी मनाच्या मनामनात स्वाभिमानाने स्फुल्लिंग चेतवणारे गीत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्य गीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला असून कविवर्य  राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणाचे गीत मार्गदर्शक सूचना तयार करून केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्य गीत म्हणून स्वीकार करण्यात येणार असून, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत असे राज्य गीत अधिकृत नव्हते, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फूर्तीदायक व प्रेरणा देणारे महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे गीत हे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारण्यात आले असून अनेक मराठी मनाच्या अभिमान गीताला आता विशेष दर्जा मिळाला असून सर्व मराठी मन अभिमानाने फुलले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे वर्णन करत असताना कवीवर्य राजा बढे यांनी या काव्याची रचना केली आहे. या  तर या गीताला श्रीनिवास खळे संगीतबद्ध केलं आहे. शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे.
महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य करणारे एक स्फूर्तिदायक आणि ऊर्जा देणारे गीत म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’! कविवर्य राजा बढे लिखित, ख्यातनाम श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या महाराष्ट्र गौरव गीताला आता अधिकृत राज्यगीताचा दर्जा प्राप्त होणार आहे, ही खरंच आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे.जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे उत्साह व प्रेरणा देणारे गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे.
सध्या देशातील फक्त ११ राज्यांचेच स्वत:चे गाणे आहे. यात आता महाराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत झाले आहे. अधिकृत राज्य गीत म्हणून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला मान्यता देण्यात आली आहे. सर्व महाराष्ट्र स्वागत करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.