जामखेड येथील निकिता सतीश पितळे चार्टड अकाउंट CA उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान मार्फत सन्मान

 जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील निकिता सतीश पितळे चार्टड अकाउंट CA उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठान मार्फत सन्मान



जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती सतीश शांतीलाल पितळे यांची द्वितीय कन्या निकिता पितळे ही चार्टर्ड सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तिचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सत्कार केला यावेळी बोलताना निकिता म्हणाली प्रत्येकाने सी.ए. परीक्षा साठी प्रयत्न करावेत जिद्द धरली तर कितीही अपयश आले तर मागे बघायचे नाही फक्त पेशंस हार्ड वर्क याकडे लक्ष दिले तर आणि लक्ष देऊन अभ्यास केल्यास सी ए परीक्षा अवघड नाही मला माझी आई सौ ज्योती पितळे आणि माझे पप्पा श्री सतीश पितळे यांचे खूप सहकार्य लाभले



तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड शहरात जैन समाजाचे आत्तापर्यंत पाच मुलं - मुली

सी ए झाले आहेत  पहिला मान अभय गुंदेचा यांना मिळाला होता

निकिताचे शिक्षण पहिली ते चौथी यशवंत प्राथमिक शाळा जामखेड पाचवी ते दहावी ल.ना. होशिंग विद्यालय जामखेड ,अकरावी ते बारावी टी.सी. कॉलेज बारामती ,बी.कॉम. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे ,एम. कॉम. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण झाले

यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी म्हणाले परीक्षा फार अवघड आहे परंतु निकिताने खूप परिश्रम घेतले आणि सीए परीक्षा पास झाली खूप खूप अभिनंदन

या समारंभ समई जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, संजय नहार ,अशोक पितळे ,सतीश पितळे ,प्रकाश पितळे, सुनील पितळे ,सनी पितळे, अनिल पितळे, नयन पितळे, शुभम प्रतीक पितळे संयोग पितळे , साहिल पितळे आणि महिला मंडळ उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.