साधा धागा वापरून पतंग उत्सव साजरा करा : मानद पशुकल्याण अधिकारी डॉ. सुरोसे

 साधा धागा वापरून पतंग उत्सव साजरा करा : मानद पशुकल्याण अधिकारी डॉ. सुरोसे



प्रतिनिधी :- अहमदनगर

नायलॉन चिनी धागा ( मांजा) यामुळे जीवित हानी होत असून पतंग उत्सव प्रेमींनी साधा पारंपारिक धागा वापरून पतंग उडवून उत्सवाचा आनंद टिकवावा. असे आव्हान ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर डॉ.धर्मराज सूरोसे यांनी केले आहे .डॉ.सुरोसे म्हनाले कि मकर संक्रातीनिमित्त होणाऱ्या पतंग उत्सवा दरम्यान काही उत्साही पतंग प्रेमीकडून नायलॉन धागा वापरण्याची शक्यता असते .त्यामुळे मनुष्य पक्ष ,पक्षी यांना दीर्घकाळ गंभीर दुखापत होते. सुज्ञ नागरिक म्हणून तरुणांनी तसेच पतंग बाजीची आवड असणारे लहान मुलांच्यमुलांच्या पालकांनी या अभियाना सहभागी होऊन साधा पारंपारिक धागा वापरून उत्सवाचा आनंद टिकवावा. तसेच पतंग यावर स्वच्छता ,बेटी बचाव बेटी पढाओ जनसंवर्धन , प्राणी संवर्धन, पक्षी संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा ,असे सामाजिक संदेश लिहून प्रबोधनकार्यात् सहभागी होण्याचे आवाहन वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर डॉ.धर्मराज सुरोसे यांनी असे आवाहन केले आहेे .दरम्यान डॉ धर्मराज सुरोसे यांनी पतंगबाजीतील नायलॉन धागा बंदी बाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.यासंदर्भात पशुसंवर्धन आयुक्त , विभागीय आयुक्त्त  कार्यालयाशी पत्रव्यवहार देखील केला होता. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात संदर्भात आयुक्त कार्यालयाकडून निर्देश देण्यात आली आहेत .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.