*इन्स्पायर अबॅकस अकॅडमी द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तर स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव*
सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ने रविवार दिनांक ०८ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय स्तरावरील ऑफलाईन अबॅकस स्पर्धेचे सरस्वती सांस्कृतिक भवन अहमदनगर या ठिकाणी आयोजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी देशभरातून ९७६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे केंद्र असून गरजू व होतकरू महिलांसाठी अबॅकस व वैदिक गणिताचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
अकॅडमी ही आपल्या दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट अभ्यासक्रम, गुणवंत व प्रशिक्षित शिक्षक वृंद, बदलत्या काळानुसार ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देणारी अकॅडमी असल्याने गुणवत्तेच्या जोरावर अकॅडमीने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व देशाबाहेरही अनेक ठिकाणी आपल्या शाखांचा विस्तार केला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पियुष इंगळे, आदर्श सानप, भाग्यश्री सानप, अनिरुद्ध चऱ्हाटे, प्रणित देसाई, आदित्य सोनवणे, आदित्य मुळे, स्वरा शिंदे, समृद्धी थोरवे, केतन पठाडे, अबोली पवार, जान्हवी टेकाळे, सार्थक झगडे, तेजस पातोडे, तनुजा खेडकर, शिवतेज पिंपळे व नैतिक शिंदे या विद्यार्थ्यांनी या चॅम्पियन ट्रॉफी चे सर्वोत्तम पारितोषिक मिळविले.
या स्पर्धेत कुमारी श्रेया रवींद्र रकटाटे या विद्यार्थिनीने पाच मिनिटांमध्ये 195 गणिते अचूक सोडून नवीन विक्रम स्थापित केला.
तसेच अकॅडमीच्या वतीने सौ. सारिका वारे यांना स्टार टीचर व सौ. कोमल कर्डुळे, सौ. वंदना वांढेकर, सौ. वंदना वाळके, सौ. अश्विनी देशमुख, सौ. सीमा घाडगे, सौ. सारिका जळमकर, सौ. मयुरी वसमतकर व श्री. सोमनाथ बोचरे या शिक्षकांना बेस्ट टीचर अवार्ड हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. गोपाळभाऊ रकटाटे (मा. उपसभापती, पं. स. आष्टी), मा. श्री सूर्यभान भद्रे (माजी सैनिक), मा. श्री. बलभीम शेळके (कृषी अधिकारी श्रीगोंदा) यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार मा. संग्राम भैय्या जगताप व मा. राज्यमंत्री तथा विधान परिषद आमदार मा. सुरेश आण्णा धस हे होते.
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.सचिन कंद (विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, अहमदनगर), श्री. बाबासाहेब शेकडे (अधीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय बीड), श्री. संजयकुमार सरवदे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सुरगाणा, जिल्हा नाशिक), श्री. विजयकुमार पोकळे (प्राचार्य, रेसिडेन्शिअल हायस्कूल अहमदनगर), श्री. सुधीर भद्रे (माझी पंचायत समिती सदस्य, अहमदनगर), श्री. दादासाहेब दरेकर (राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अहमदनगर), श्री. मोहन कळमकर (पोलीस उपनिरीक्षक ठाणे) या आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ. सत्यशीला भद्रे व संचालिका सौ अर्चना शेळके मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले व त्यांना या कार्यात अकॅडमीतील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र टाक, प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप भद्रे व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री. दादासाहेब शेळके यांनी केले.
stay connected