बहुचर्चित विदर्भाच्या रेल्वे प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा ओनामागौणखनिज भ्रष्टाचार प्रकरणाच्या दंडात्मक कारवाईमुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये हडकंप
सुनील शिरपुरे/यवतमाळ
यवतमाळ मधील बहुचर्चित विदर्भाच्या इतिहासातील सर्वात मोठा वर्धा-यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणाच्या संबंधित मंत्री महोदयांकडून कारवाईची सुरुवात होताच या भ्रष्टाचार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांमध्ये हडकंप सुटला आहे.
सविस्तर वृत्त असे की, वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौण खनिज रेल्वे कंत्राटदार, उपकंत्राटदार यांनी राज्य शासनाच्या संबंधित विभागातील काही भ्रष्ट बड्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून खुलेआम खुल्या बाजारात करोडो रुपयात विकला व दर दिवशी करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवून अधिकारी व कंत्राटदाराने उपक्रम दराने दर दिवशी करोडो रुपयाची कमाई केली. याबाबत तक्रारदार विसल ब्लोवर नॅशनल युनियन ऑफ जर्ऩलिस्ट महाराष्ट्रचे राज्यसचिव अमोल कोमावार यांनी साक्षी पुराव्यासह दस्तऐवज व जाय मोक्यावर जाऊन मुद्देमालासह संबंधित जिल्हा खणीकर्म अधिकारी यांना पकडून दिल्यानंतर सुद्धा कुठलीच कारवाई केल्या गेलेली नसल्यामुळे याबाबत संबंधित वरिष्ठ मंत्री महोदय यांना निवेदन दिले. त्याचसोबत "आमरण उपोषण", "जिंकू किंवा मरू" राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. परंतु या भ्रष्टाचार प्रकरणावर आतापर्यंत कुठलीच कारवाई केली गेलेली नव्हती. त्यामुळे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने येण्याचे टाळले. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेभंगाची कारवाई सुध्दा चालू झालेली आहे.
सध्या संबंधित प्रकरणात तक्रारीनुसार चौकशी करून ई.टी.एस. मोजणी करून येणारी दंडात्मक रक्कम संबंधित भ्रष्ट अधिकाराच्या खाजगी संपत्तीतून वसूल करण्यात यावी. या करोडो रुपयांच्या गौणखनिज भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी रेल्वे कंत्राटदार आर भरत रेड्डी, उपकंत्राटदार अमित सुभाष मुथा, अरविंद भेंडे, ईश्वर राव, भास्कर, सूर्यवंशी, येळणारे त्याचबरोबर मुख्य आरोपी असणारे कुणाल झाल्टे तहसीलदार यवतमाळ, तहसीलदार कळंब, राजेंद्रगिर गोसावी ( निवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी), अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ व यांचे ईतर सहकारी इत्यादी आहेत. त्यामुळे यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून सक्त व दंडात्मक कारवाईसाठी माननीय अंबादासजी दानवे विरोधी पक्ष नेता विधान परिषद यांनी संबंधित महसूलमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे व इतर मंत्री महोदयांना सप्त चौकशीसाठी व कारवाईसाठी पत्रव्यवहार करून या भ्रष्टाचार प्रकरणातील संपूर्ण भ्रष्ट अधिकारी व रेल्वे कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी मागणी केलेली आहे.
stay connected