अ.नगर - बीड मार्गावरील सांगवी पाटण नजीकचे ब्लॅक स्पॉट कायमचे नष्ट करा - समीर शेख

 अ.नगर - बीड मार्गावरील सांगवी पाटण नजीकचे ब्लॅक स्पॉट कायमचे नष्ट करा - समीर शेख 



 सांगवी -  आष्टी तालुक्यातील नगर -बीड महामार्गावर सांगवी पाटण नजीक दोन अति चढ, उतार असल्याने अपघात प्रवण क्षेत्र बनले असून,रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट तत्काळ कायमचे नष्ट करावेत  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदन देऊन करणार आहेत.

       या धोकादायक चढउतारामुळे या ठिकाणी सतत अपघात होतं आहेत. दिवसातून एक दोन अपघात होत आहेत, काल रात्री असाच एक अपघात होता होता टळला  झालं असं कि,दोन वाजता अचानक गाडी चढावरती बंद पडली, व पाठीमागून  येणारी गाडी ओव्हरटेक करायला गेली ,तोपर्यंत समोरून उतार असल्यामुळे  मालवाहतूक गाडी जोरात आली, प्रसंगावधान दाखवत  वाहन चालकाने ब्रेक दाबल्यामुळे दैव बलवत्तर म्हूणन हा अपघात टळला,

       पण त्या दोन ड्रायव्हरमध्ये वादांग निर्माण झाला.एक तास दोन्ही  वाहन रस्त्यात असल्याने ट्राफिक जाम झाली.  या घटनेची माहिती मिळताच  जवळच असलेले सामाजिक कार्यकर्ते. समीर शेख वस्तीवरील त्यांच्या सहकार्याने  यशस्वी मध्यस्थी करत  वाद मिटवला व रस्ता वाहतूक साठी खुला केला.

  अशा जीव घेण्या अपघातासह असे अपेक्षित प्रसंग टाळण्यासाठी,  अपघातांचे प्रमाण लक्षात घेता ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख हे सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे निवेदन द्वारे करणार आहेत




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.