*राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती संपन्न.*
प्रतिनिधी चंद्रकांत पाटील / लातुर -
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे आज दिनांक 12/जानेवारी/2023 रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. मोठ्या आनंदाने उत्साहाने ही जयंती संपन्न झाली. या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयातील ज्येष्ठ महिला शिक्षिका *श्रीमती तूगावे मॅडम या होत्या. तर प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून श्रीमती पाटील मॅडम, तथा श्रीमती अगवाने मॅडम, उपस्थित होत्या. मंचावर प्राचार्य श्री संजीव कदम सर, श्री पाटील सर,श्री सूर्यवंशी डी.एन सर, श्री काळे सर* उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात *राजमाता जिजाऊ, युगपुरुष स्वामी विवेकानंद, व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई व जिजाऊ यांच्यासारखा पोशाख परिधान केलेला होता विद्यालयातील जवळपास 175 विद्यार्थिनींनी सावित्रीबाई व जिजाऊ बनून आल्या होत्या. आणि त्यांचा उत्साह गंगना मध्ये मावत नव्हता, या प्रसंगात याप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाजकार्याचा धागा पकडून विद्यालयातील विद्यार्थिनींनी नाटिका प्रस्तुत केली त्यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी नाटिका क्रं 1-सावित्रीबाई व शिक्षण 2-मुलींचे शिक्षण 3-आम्ही हुंडा देणार नाही 4-सामाजिक संदेश पर नाटिका. त्यानंतर सहावीच्या विद्यार्थिनींनी दोन सुंदर देशभक्तीपर नृत्य सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य प्रस्तुतीकरण केले. व विद्यालयातील विद्यार्थिनींनी अनेक गीत प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पाटील सर यांनी केले तर सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती तुगाव मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
stay connected