चैतन्यस्वामी देवस्थान विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही ----आ.बाळासाहेब आजबे
देवळाली (वार्ताहार)
आष्टी तालुक्यातील देवळाली येथील स्वामी चैतन्यानंद महाराज देवस्थान हे बीड व नगर जिल्ह्यातील एक जागृत व प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते तालुक्यातील सर्वात मोठा सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी होत असते धार्मिक परंपरा जपण्याचे काम त्या माध्यमातून देवळाली ग्रामस्थांकडून केले जाते हे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हावे यासाठी देवस्थानचा विकास होणे गरजेचे आहे या देवस्थान परिसरातील विविध विकास कामासाठी आपण या अगोदरही वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे व यापुढेही जिथे जिथे आवश्यक कामे आहेत त्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी देवळाली येथे बोलताना सांगितले.
आष्टी तालुक्यातील देवळाली येथील स्वामी चैतन्यानंद महाराज यांच्या 52 व्या पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ह भ प शंकर महाराज शेवाळे यांची राम कथा सुरू असून या कथाप्रसंगी आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी उपस्थित दर्शवली यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी देवळाली ग्रामस्थांच्या वतीने भव्यदिव्य असा सप्ताह या ठिकाणी केला जातो हे देवस्थान जागत देवस्थान असून आष्टी तालुक्यातील विविध भागातून लोक पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी येतात त्यामुळे या देवस्थानचा विकास होणे गरजेचे आहे आजपर्यंत आपण मंदिर परिसरातील विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे यापुढेही भक्तनिवास किंवा इतर काही कामासाठी आपण वेळोवेळी निधी उपलब्ध करून देऊ कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता भासू देणार नाही ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक कार्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे धार्मिक सलोखा असेल तरच गावाचा विकास होत असतो त्यामुळे गावात विविध विकास कामासाठी ही आपण कमी पडणार नसल्याचे यावे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले, तर माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी रामायण कथेचा आधार देत महिलांनी आपली कुटुंब व्यवस्था प्रामाणिकपणे सांभाळली पाहिजे कुटुंब व्यवस्था चांगली असेल तर समाज व्यवस्था चांगले राहते म्हणून महिलांनी आपल्या मुलं व मुली वरती चांगले संस्कार करावेत व एक आदर्श पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे चांगली पिढी घडवण्याचे काम हे कुटुंब व्यवस्थेतून होत असते रामायण कथेतून अनेक गोष्टी घेण्यासारखे आहेत कथेचा रसग्रहण करत असताना आपल्या कुटुंब व्यवस्थेला व आपल्याला जे जे आवश्यक गुण आहेत ते आपण घेतले पाहिजेत सत्य अज्ञाधारकता ज्येष्ठांचा आदर आणि कुटुंब व्यवस्था यासारखे गुण घेतले पाहिजेत चैतन्य स्वामी यांच्या वास्तव्याने देवळाली चा परिसर हा धार्मिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे त्यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्यास मदत झाली आहे यापुढेही धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमही या माध्यमातून ग्रामस्थांनी राबवावेत अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे उद्योगपती शेळके ज्येष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे सरपंच पोपट शेकडे नवनाथ तांदळे दिलीप तांदळे मुरलीधर शेकडे कृष्णा तांदळे सुभाष वाळके पत्रकार अंकुश तळेकर बबन रांजणे उपसरपंच राजेंद्र पवार विठ्ठल हिंगणे राजेंद्र आमले गजानन कुलकर्णी शहाजी देशमाने अंबादास भोजने निलेश पवार दत्तू नवले पम्पू नाना खाडे रमेश खाडे गणेश खाडे अतुल जवणे बाळू नवले रमेश पवार अण्णासाहेब गुंजाळ अनिल मोहिते दीपक जगदाळे डॉक्टर कल्याण पवार विठ्ठल तांदळे सिद्धेश्वर झांजे विठ्ठल गडकर अरुण शेळके नगरसेवक नाजीम शेख, हनुमंत टकले रमेश कटके दीपक पवार कृष्णा नागरे यांच्यासह देवळाली व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected