जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वाचवले एकाचे प्राण
शुक्रवार दिनांक१३/१/२०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता योगेश शिंदे या व्यक्तीने संजय कोठारी यांना फोन केला रस्त्यावर एका पिकप वाल्याने एका माणसास उडवले आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे
संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन आपले सहकारी महेंद्र क्षीरसागर याला घेऊन जामखेड येथील एस.टी. स्टँड जवळ महाराष्ट्र बँकेच्या रोडला रोड वर एक माणूस रक्ताळलेल्या अवस्थेत पडला होता त्याच्या डोक्याला आणि पायाला खूप मार लागला होता चौकशी केली असता एक पिकप गाडीने त्याला उडवून तो गाडीवाला पळून गेला अशी माहिती मिळाली
संजय कोठारी यांनी त्यास ताबडतोब आपल्या रुग्णवाहिकेत टाकून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यास आणून ताबडतोब डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज केले यावेळी महेंद्र शिरसागर, श्याम जाधवर, मोहित कदम ,मजहर खान आदींनी मदत केली
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले सगळ्या ठिकाणचे रोड खराब झाल्यामुळे गेल्या आठ दिवसात सात अपघात झाले असून त्यातील सहा अपघातातील सात जण मी आणले असून ते वाचले आहेत
stay connected