*औरंगाबाद आंतरभारतीच्या**अध्यक्षपदी एड. श्रीकिशन शिंदे**प्रथम कार्यकारिणीची निवड*
औरंगाबाद-
साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आंतरभारती या संस्थेच्या शाखेची प्रथम कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली असून अध्यक्षपदी अॅड.श्रीकिशन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सचिवपदी डॉ. अलका वालचाळे व कोषाध्यक्षपदी उज्ज्वला निकाळजे जाधव यांची निवड करण्यात आली. जॉय डॅनियल आणि प्रतिभा शर्मा यांना उपाध्यक्षपदाचा मान देण्यात आला.
कार्यकारिणी सदस्य म्हणून सतीश साखरे, विश्वनाथ उतकर, वैशाली आठवले, गजानन चिमणकर, अर्चना ददापूरे, प्रशांत गौतम, भारत रायमाने, विजय रायमाने, डॉ. महेश सोनपेठकर, सारंग हबीब, उदगे, एल.डी.पाटील, डॉ.अनिता देशपांडे यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीचा सत्कार राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब आणि राष्ट्रीय सचिव डॉ.डी.एस. कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
*स्त्री सन्मान-*
औरंगाबादमध्ये ताराबाई शिंदे यांच्या नावाने 'स्त्री सन्मान' हा पुरस्कार सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला देण्याचा निर्णय नुकत्याच स्थापन झालेल्या आंतरभारतीच्या नव्या कार्यकारिणीने घेतला.
stay connected