जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती शाहू दिव्यांग विद्यालयाचे नेत्रदीपक यश

 जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती शाहू दिव्यांग विद्यालयाचे नेत्रदीपक यश



आष्टी (प्रतिनिधी)

बीड जिल्ह्यातील 45 दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा दि.०९ व १० जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाई येथे संपन्न झाल्या,या जिल्हास्तरीय दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धेत आष्टी येथील छत्रपती शाहू महाराज निवासी दिव्यांग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आठ प्रथम पारितोषिक जिंकत जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवला आहे  तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट हे नृत्य सादर करून द्वितीय पारितोषिक मिळवले आहे.

     जिल्हा समाज कल्याण कार्यालय बीड आणि कै.सुमतीताई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ  अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबाजोगाई योगेश्वरी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर  दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय आष्टी येथील 12 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यापैकी आठ विद्यार्थ्यांनी प्रथम तर दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नेत्र दीपक यश मिळवले आहे, बाळेवाडी जिल्हा पुणे येथे दिनांक 5 व 6 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय दिव्यांगांच्या स्पर्धा होणार असून या स्पर्धेत हे आठ विद्यार्थी बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता नकाते साहेब, संस्थेचे अध्यक्ष सुखदेव पोकळे सचिव भास्कर भवर मुख्याध्यापक विजय कुमार झांजे मार्गदर्शक सुधीर घोडके, शरद तळेकर मनोहर कवडे यांच्यासह शाळेतील शिक्षक बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.