वंजारवाडी ग्रामपंचायत ऑनलाईन करा. मा दादा पवळ पत्रकारयांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धामणगाव: दादा पवळ
आष्टी तालुक्यातील वंजारवाडी ही ग्रामपंचायत गेली आठ वर्षापासून ऑनलाईन नाही त्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. धामणगाव ग्रामपंचायत मधून वीभक्त होऊन नव्याने अस्तित्वात आलेली वंजारवाडी बोरडवाडी लाटेवाडी ग्रुप ग्रामपंचायत. लाटेवाडी बोरडवाडी ह्या दोन वाड्या गेली आठ वर्षापासून ऑनलाईन झालेले आहेत पण वंजारवाडी हे ग्रामपंचायतचे कार्यालय असलेले गाव अजूनही ऑनलाईन न झाल्यामुळे येथील नागरिकांना कुठल्याच प्रकारचा पिक विमा भरता येत नाही. ऑनलाईन सातबारा निघत नाही. खरेदी विक्री करण्यासाठी खूप अडचणी येतात. पिक विमा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. वंजारवाडी हे गाव ऑनलाईन करावे ही मागणी घेऊन आष्टी येथे नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी मॅडम यांना निवेदन देताना वंजारवाडी चे सरपंच मा संजय महाजन व दादा पवळ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते. दिसतं आहेत . श्रीमती शारदा दळवी मॅडम म्हणाल्या की हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू. व सर्व सामान्य नागरिक शेतकरी कुठल्याही शासकीय स्कीम मधून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ. वंजारवाडी हे ग्रामपंचायत असलेले गाव मागिल ८ वर्षांपासून ऑनलाइन नाही.वंजारवाडी ग्रामपंचायत लवकरात लवकर ऑनलाइन करावी अशी मागणी आष्टीचे नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी मॅडम यांना दादा पवळ पत्रकार व संजय महाजन सरपंच यांनी निवेदन देऊन केली आहे. वंजारवाडी ग्रामपंचायत ऑनलाईन न झाल्यास तहसील कार्यालयासमोर दि २८ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे
stay connected