*महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे खरी कमाई चे आयोजन*
आपल्या व आपल्या पालकांच्या कष्टाचे,मेहनतीचे महत्त्व समजले पाहिजे पैसा कमवायचा कसा त्यासाठी किती मेहनत आवश्यक आहे, त्यासाठी किती कष्ट केले पाहिजेत, एखादा व्यवसाय उभा करायचा किंवा चालवायचा म्हणजे त्यामध्ये गुंतवणूक किती करायची व नफा कसा प्राप्त करायचा या सर्वांची ओळख व्हावी म्हणून गेल्या चार दिवसापासून *महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे *खरी कमाई* चे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये येता पाचवीपासून ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खरी कमाई करण्याचा मनस्वी आनंद घेतला यामध्ये अनेक स्वादिष्ट व्यंजन विद्यार्थ्यांनी स्वतः बनवले होते ज्यामध्ये दाळ रोटी, झुणका भाकर, भजी भाकर आंबील,निलंगा राईस, व्हेज बिर्याणी,पाणीपुरी, इटली,भेळ,चिवडा,सुसेला, दही पोहे, वडापाव, असे अनेक स्वादिष्ट व्यंजनचा आस्वाद अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला
stay connected