खा.डॉ.प्रीतम मुंडे आणि आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने..*********************प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २१ कोटी रुपयाच्या चार रस्ते कामांना मंजुरी...
**********************
***********************
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार दैनंदिन दळणवळण सुसह्य होण्यासाठी रस्ते कामांची आवश्यकता लक्षात घेऊन आ.सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय तडफदार खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे कडे सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि जनतेच्या या जिव्हाळ्याच्या असलेल्या मागणीस खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे
आष्टी तालुक्यातील...
राष्ट्रीय महामार्ग ५६१ साबलखेड ते चिंचोली ४.३० कि.मी. किंमत ४६३. ८७ लक्ष.रू
पाटोदा तालुक्यातील...
राष्ट्रीय महामार्ग ५७० जवळाला फाटा ते पाटोदा ५.३० कि.मी.किंमत ६६१.११ लक्ष रु.
राज्य मार्ग १६ अमळनेर ते निवडुंगा ते चिंचोली कि.मी.६.७० ६२०.५२ लक्ष रु
कुसळंब ते वानेवाडी ते पारनेर ४.७० कि.मी. किंमत ३६७.९५ लक्ष रु. अशा एकूण चार रस्ते कामांसाठी २१ कोटी १३ लक्ष ४५ हजार रु. मंजूर करण्यात आलेले आहेत लवकरच ही कामे सुरू करण्यात येतील गेल्या अनेक दिवसापासून च्या या दर्जेदार रस्ते व्हावेत अशी या भागातील जनतेची मागणी होती त्यानुसार आमदार सुरेश धस यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने या कामांना मंजुरी दिली आहे त्यामुळे या चारही कामांच्या परिसरातील गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
stay connected