*केज तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेची तालूकास्तरीय जन सुनावणी संपन्न.*
==========================
केज (प्रतिनिधी)
दि.१२ रोजी केज येथे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन हे सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत केज तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज येथे. एकूण १६ शाळांचे सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन हे सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत सामाजिक अंकेक्षण व मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपावर आधारित जन सुनावणीचे आयोजन गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज येथे करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यावर जन सुनावणीचे पॅनलने निर्णय दिले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी मा. केंद्रे साहेब, निरीक्षक मा. डरपे साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. शिवाजीराव खाडे सर, वसंत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. चव्हाण सर, तालुका साधन व्यक्ती बाळासाहेब खाडे, सोनबा राऊत व सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबईचे जिल्हा साधन व्यक्ती मा. सुशील थोरात यांनी कामकाज पाहिले. यावेळी संबंधित सर्व मुख्याध्यापक, सहशिक्षक, इतर कर्मचारी उपस्थित होते.
stay connected