*प्रामाणिक पत्रकारितेतुन केलेल्या जनसेवेचा आनंद अनमोल असतो . पत्रकारितेच्या माध्यमातुन जनसेवा करत राहणार* - *संदीप जाधव*
आष्टी ( प्रतिनिधी ) - पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील शोषीत पिडीत वंचीत घटकांचा आवाज बुलंद करून त्यांना न्याय मिळवून देण्यात जो आनंद मिळतो तो अनमोल असतो म्हणुनच सातत्याने पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचीसेवा करत राहणार असे मत तेजवार्ता न्युज चे उपसंपादक संदीप जाधव यांनी व्यक्त केले . त्यांच्या वाढदिवसा निमीत्ताने मंगळवार दि १० जानेवारी रोजी दिवसभर त्यांच्यावर विवीध माध्यामातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता . समाजातील विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीया , भ्रमणध्वनी , मॅसेज आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या . संदीप जाधव यांनी तेजवार्ता न्युज नेटवर्क मध्ये न्युज रिपोर्टर म्हणून दोन वर्षे काम पाहिले तर त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची तेजवार्ता च्या उपसंपादक पदावर नियुक्ती करण्यात आली . त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सुरु ठेवली व अल्पावधीतच राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे . त्यांचा मनमिळावू व हसतमुख बोलका स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे . सर्वसामान्यांचा पत्रकार अशी त्यांची ओळख बनली आहे . त्यांच्या वाढदिवसा निमीत्त ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ केदार, आ . सुरेश धस , आ बाळासाहेब आजबे , माजी आ भिमराव धोंडे तसेच तेजवार्ता चे संपादक सय्यद बबलूभाई , माजी सभापती अंकुश चव्हाण , अनिल तात्या ढोबळे , डॉ शिवाजी शेंडगे , रविंद्र काका ढोबळे डॉ महेश नाथ. किशन तांगडे,दिपक निकाळजे, पँथर चे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे पत्रकार संजय खंडागळे, योगेश भंडारी, बिपीन भंडारी संतोष ससाणे, औटे दाजी फौजी , फौजी मुनीर भाई ,आयुब मोमीन, महादेव वामण,हमजान शेख, अनिल मोरे, सय्यद रिजवान , मनोज पडोळे, अतुल शिरोळे, तसेच असंख्य मित्रपरिवार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच सर्व पत्रकार मित्र व कडा शहरातील मित्रपरिवाराने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला .
stay connected