केज तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर सचिवपदी तात्या गवळी यांची सर्वानुमते निवड .
केज /प्रतिनिधी
केज शहरातील फुलेनगर भागातील सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयात जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.याबैठकीमध्ये सर्व सदस्यांनी एकमताने चर्चा करून केज तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाची स्थापना केली. केज तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर सचिव पदावर तात्या गवळी,कोषाध्यक्ष विवेक बनसोड,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड आणी रवींद्र मेटे,सहसचिव पदावर सुहास पवार, सहकोषाध्यक्ष ज्योतीराम सावंत,प्रसिद्धीप्रमुख विश्वास राऊत तर कायदेशीर सल्लागार ॲड.सतीश मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी दैनिक जंगचे तालुका प्रतिनिधी ज्योतीराम सावंत, सा.शिववाणी तालुका प्रतिनिधी विवेक बनसोड, दैनिक लोकमित्राचे विडा ग्रामीण प्रतिनिधी प्रदीप गायकवाड,दैनिक राजयोगचे नांदूरघाट प्रतिनिधी रवींद्र मेटे, दैनिक सांजसुयोगचे तालुका प्रतिनिधी सुहास पवार यांच्या निवडी झाल्याबद्दल केज तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक बनसोड यांनी केले.यावेळी स्वाभिमानी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पाटील व ज्योतीराम सावंत यांनी सर्व सहकारी सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवींद्र मेटे तर सर्वांचे आभार तात्या गवळी यांनी मानले.
stay connected