भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे सांगली जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात साजरे
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, कवीसंमेलनने, सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्थने महाराष्ट्रभर आपला विस्तार केला, नुकताच या संस्थेच्या सांगली जिल्हा शाखेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विविध उपक्रमांचे आयोजन करत तळागाळातील कवी लेखकांना, तरूणांना, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी संस्था हीच या संस्थेची खरी ओळख. हीच आपली ओळख जपत भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या वतीने विद्यार्थांसाठी हस्ताक्षर व चित्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या वेळी साटपेवाडी गावच्या सरपंच मा.सुरेखाताई साटपे..जि.शाळा साटपेवाडी मधील शिक्षक मा.वाटेगावकर सर..मा..महापूरे, प्रदेश कार्याध्यक्ष व राष्ट्रीय सचिव मा. सुमंत पाटील यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेला लाभली.
नवोदित कवी, लेखकांकरीता हक्काने काम करणा-या मोजक्याच संस्था आहेत. पण विशेषतः तळागाळातील, दुर्लक्षित नवोदितांना त्यांचं हक्काचं व्यासपीठ भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देत आहे असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले व जेव्हा जेव्हा आपणांस मदतीची गरज भासेल तेव्हा आमचे सहकार्य नक्कीच लाभेल असेही आश्वासन दिले.
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित या स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, संघटक विक्रांत पाटील या पदाधिकारी यांनी मेहनत घेत हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न केला त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
stay connected