माधुरी मगर-काकडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार.
आम्रपाली धेंडे
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक अकादमीच्या वतीने धुळे शहरात 24 व 25 डिसेंबर 2022 ला दोन दिवसीय 'दुसरे फुले-आंबेडकर विचार शिक्षक संमेलन' होत आहे.
नागनाथ कोत्तापल्ले सभा मंच, राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिर, पारोळा रोड, धुळे येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस भूषवणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे, डॉक्टर मिलिंद बागुल, जिल्हा परिषद धुळे अध्यक्षा अश्विनी पवार, महापालिकेचे अप्पर आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा कोषागार अध्यक्ष प्रवीण देवरे, श्री.रविंद्र खैरनार आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित असणार आहेत.
परिसंवाद, काव्यसंमेलनाचे आयोजन केले गेले आहे.
लोकसभेचे माजी उपाध्यक्ष सरदार चरणजितसिंग अटवाल (पंजाब) यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार फारुक शाह, आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस् , महापौर प्रवीण कर्पे, उपमहापौर नागसेन बोरसे आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर अमृतसागर व इतर कार्यकर्त्यांनी सर्वांना उपस्थितीचे आवाहन केले आहे.
माधुरी मगर- काकडे, दौंड. यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल परिसरातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
stay connected