*केज शहरात लवकरच सुसज्ज व भव्य असे सांस्कृतिक सभागृह ऊभे राहणार – हारुणभाई इनामदार*

 *केज शहरात लवकरच सुसज्ज व भव्य असे सांस्कृतिक सभागृह ऊभे राहणार – हारुणभाई इनामदार*



============================

केज / प्रतिनिधी

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या व खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे बीड जिल्ह्याचे नेते रमेशराव आडसकर तसेच स्थानिक नेते अंकुशराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हारुणभाई इनामदार यांनी सुतोवाच केले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुका अंतर्गत होणाऱ्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यासाठी विविध स्पर्धांच्या सरावासाठी आणि आयोजित इतरही विविध उपक्रमांसाठी सर्व सोयींनीयुक्त भव्य असे क्रीडासंकूल व सांस्कृतिक सभागृह निर्माण होणे आवश्यक आहे.  उपरोक्त विषयास अधिन राहून मराठवाडा जनता विकास परिषद शाखा केजच्या वतीने केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांचेकडे निवेदन देण्यात आले आहे. केजच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी नगर पंचायत केजच्या हद्दीत सुसज्ज असे सांस्कृतिक सभागृह व क्रीडा संकूल उभारण्यासाठी विशेष बजेटची तरतूद करुन हे काम मार्गी लावावे. या संदर्भात मराठवाडा साहित्य परिषदेने घेतलेल्या एकूण पाच मराठी साहित्य संमेलनातून ठराव घेवून नगरपंचायतमधे सादर केलेले आहेत परंतू याची अद्याप दखल घेतल्याचे दिसत नाही म्हणून गुरुवारी एक निवेदन देण्यात आले होते. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने या प्रश्नावर आंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात म्हटले आहे…. यासंदर्भात जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार यांनी दखल घेतली आहे आणि लवकरच येत्या काही दिवसात काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या व खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे बीड जिल्ह्याचे नेते रमेशराव आडसकर तसेच स्थानिक नेते अंकुशराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही लवकरच सोडवणार असल्याचे जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हारुणभाई इनामदार यांनी सुतोवाच केले आहे





आ. नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून केजकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार!

केज शहरात भव्य दिव्य सांस्कृतिक सभागृह व्हावे म्हणून जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करून PWD ची जागा नगरपंचायत कडे घेऊन स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक सभागृहाच्या नावाने जागेचा पिटीआर केलेला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमितताई अक्षय मुंदडा यांनी याठिकाणी सभागृहाच्या उभारणीसाठी बजेट मंजूरीकरीता वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे केजमधे लवकरच भव्य आणि दिव्य असे सांस्कृतिक सभागृह होणार असल्याचे कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.