वाहीरा येथे किसान दिनानिमित्त गोष्टी कार्यक्रम संपन्न....
------------------------------------
संदिप जाधव/आष्टी
तालुक्यातील वाहीरा आज दि.२३ डिसेंबर रोजी किसान दिनानिमित्त महिला किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांच्या मार्फत किसान दिनानिमित्त महिला किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी आष्टी श्री गोरख तरटे व गावचे सरपंच श्रीमती.गोदावरी गाडे या उपस्थित होत्या
आजचा कार्यक्रम हा महिला शेतकरी वर्गासाठी आयोजित केला होता कारण महिलांचे शेती मध्ये खूप योगदान असते तसेच महिलांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र धोंडे (स.त.व्य) आत्मा यांनी केले या वेळी श्री गोरख तरटे यांनी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस फरदड निर्मूलन,हरबरा पिकावरील घाटे अळी व्यवस्थापन,कांदा पीक व्यवस्थापन,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना(PMFME) या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच श्री बेग साहेब (ता.त.व्य)आत्मा यांनी सेंद्रीय शेती यावर मार्गदर्शन केले श्रीमती.भुकन मॅडम(कृ.स)यांनी कृषी विभागातील योजने बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमानंतर अल्पोउपहराची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमास डॉ ऋषी हजारे,भाऊसाहेब झांजे,श्रीमती बोरकर तसेच शेतकरी महिला गट व इतर महिला शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
stay connected