डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना न्यायप्रभात जीवन गौरव पुरस्कार प्रदान !!!

 डाॅ.मधुसूदन घाणेकर 
यांना न्यायप्रभात जीवन गौरव पुरस्कार प्रदान  !!!



आम्रपाली धेंडे


पुणे : विश्वविख्यात साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी आणि न्यायप्रभात मासिक वृत्तपत्र तर्फे संस्थापक अध्यक्ष आणि संपादक शिवाजीराव खैरे यांच्या शुभहस्ते न्यायप्रभात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान व गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी

डाॅ. घाणेकर यांना निमंत्रित केले होते,सदर प्रसंगी त्यांना सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते

सुमारे 150 नवोदित कवी.कवयित्रींना

आणि विविध पातळीवरील यशस्वीतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या

साहित्य क्षेत्रातील झंजावती वाटचालीस 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 

न्यायप्रभात जीवन गौरव पुरस्कार 

प्रदान करण्यात आल्याचे खैरे यांनी सांगितले.डाॅ.घाणेकर यांची साहित्य, अध्यात्म, हस्ताक्षर मनोविश्लेषण, 

ज्योतिष आदि विषयक 225 पुस्तके

प्रकाशित झाली असून सुमारे 100हून

अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.

छान वाचा..छान लिहा..छान जगा

असा डाॅ.घाणेकर यांनी अध्यक्षीय भाषणात संदेश दिला.काही काव्यसंग्रहांचे प्रकाशनही त्यांच्या शुभहस्ते झाले.स्वलिखित गझल, कविता, आणि चित्रपट गीत सादर करुन डाॅ.घाणेकर यांनी सारा माहोल

जिंकून घेतला.याप्रसंगी ॲड.विनोद गोल्हार, कोषाध्यक्ष अनुसया खैरनार,   तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक अध्यक्ष आणि मधुरंग च्या उपाध्यक्ष प्रिया दामले आदि मान्यवर उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.