आ. राम शिंदे यांना कोरोना काळात पाणीपुरवठा योजनेचे पडलेल्या स्वप्नावर श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहेत.
- - - - - - - - - - - - - - - - - - -
जामखेड - कोरोना काळात ते ( राम शिंदे) कोठे दिसत नव्हते. तत्वतहा मान्यता मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेचे ते स्वप्न पाहत होते. त्या स्वप्नात त्यांनी याबाबत कसा पाठपुरावा केला व लगेच मुख्यमंत्री यांनी कशी स्वाक्षरी केली. या स्वप्नातून ते बाहेर पडले आणि आपणच पाणीपुरवठा योजना कशी मंजूर करून आणली याचा कागद दाखवून श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत अशी टीका आ. रोहीत पवार यांनी करून सदर योजनेला आपण कसे मुर्त स्वरूप देऊन पाठपुरावा केला याबाबत कागदोपत्री पुरावे दाखवून आ. राम शिंदे यांच्या श्रेयवादीच्या लढाईतील हवा काढून घेतली.
आ. रोहीत पवार म्हणाले, तत्वता मान्यता म्हणजे एखाद्या कार्यक्रमात झालेली घोषणा होय. अशीच घोषणा २०१९ साली निवडणूक प्रचार सभेत तत्वता मान्यता देऊन १०६ कोटी रुपयांची घोषणा सहजपणे केली होती. मतदार संघातील जनतेने मला लोकप्रतिनिधी बनवले व चमत्कार होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित पहिले काम तत्वता मान्यता मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पाठपुरावा केला.
जामखेड शहर व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेकरिता २४९ कोटी मंजूर केल्याबद्दल त्यांचा सत्कार जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अयोजीत करण्यात आला होता यावेळी आ. रोहीत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले तत्वता मान्यता मिळालेल्या पाणीपुरवठा योजनेत मोठय़ा प्रमाणावर त्रुटी होत्या यामध्ये सात वाड्यावस्त्यांचा समावेश नव्हता तसेच शहरातील काही भाग पाण्यापासून वंचित राहणार होता.
त्यामुळे नवीन प्रस्ताव संमदीत अधिकारी यांच्याकडून १३८ कोटीचा तयार केला. यानंतर कोरोना काळात सर्व जग ठप्प झाले होते व ती योजना लांबणीवर पडली. यामुळे स्टील व सिमेंटच्या किंमती वाढल्या. टेंडर निघाले पण ते कोणी घेईना यानंतर पुन्हा या किंमती विचारात घेऊन सुधारीत प्रस्ताव तयार करून सर्व खर्चासह १७९ कोटीचा झाला तसेच भुयारी गटारी आवश्यक असल्याने त्यासाठी ७० कोटीचा प्रस्ताव तयार केला.
पाणीपुरवठा व मलनिस्सारण असा २४९ कोटी प्रस्ताव तयार करून शासनाकडे मे महिन्यात दाखल झाला. यानंतर राज्यात सत्तांतर झाले तरीही पाच महिन्यांपासून पाठपुरावा सरकारकडे चालू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली पण त्यांनी सांगितले तुमचे विरोधक सही करु नका म्हणतात. जामखेड शहराची पाणीपुरवठा योजना रखडू नये म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना सांगितले तुम्ही त्यांना मंजुरीचे पत्र द्या तसे मुख्यमंत्र्यांनी दिले. या पत्रावर ते म्हणतात आम्हीच योजना मंजूर करून आणली.
पाणीपुरवठा योजना मंजूर करायची हे एका दिवसाचे काम नाही. जनता दुधखुळी नाही त्यांना सर्व माहित आहे. त्यांनी भुमीपुजनला कोणाला बोलवले तरी आम्ही त्यांच्या शेजारी सभा घेऊन या पाणीपुरवठा योजनेबाबत माहीती सांगू कोरोना काळात ते दिसत नव्हते पण तुम्ही आम्ही सर्वजण जनतेच्या सेवेत होतो. पाणी योजनेच्या श्रेयासाठी आता ते धडपड करीत असल्याची टीका आ. रोहीत पवार यांनी केली.
stay connected