*युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी प्रा. मिरगाळे तर तालुकाप्रमुखपदी वांजरवाडे यांची फेरनिवड*
लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील
निलंगा: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी प्रा. आण्णासाहेब मिरगाळे तर निलंगा तालुकाप्रमुखपदी प्रशांत वांजरवाडे यांची फेर निवड करण्यात आली.
प्रा. आण्णासाहेब मिरगाळे व प्रशांत वांजरवाडे हे मागील एक वर्षापासून शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार ई. लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करतात . प्रत्येक गावातील लोकांची तक्रारी सोडवण्यात सदैव तत्पर असतात. यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाकडून योग्य माणसाची फेर निवड केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, निलंगा विधानसभेचे शिवसेनेचे नेतृत्व तथा ज्येष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती बजरंग दादा जाधव, महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभाताई बेंजरगे, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, हरिभाऊ सगरे, तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, भागवत वंगे, पंडित अण्णा भंडारी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, राहुल मातोळकर, लक्ष्मण पेठकर, शिवसेना शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, व्यापारी आघाडीचे तालुकाप्रमुख प्रसाद मठपती, आडत व्यापारीप्रमुख किसन मोरे, महिला तालुका संघटिका रेखाताई पुजारी, शहर संघटिका दैवता सगर, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख लायकपाशा शेख इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.
stay connected