प्रचाराच्या तोफा थंडावल्या .कोण होणार गावचा सरपंच ? अनेक ठिकाणी उत्सुकता शिगेला .

 प्रचाराच्या तोफा थंडावल्या .कोण होणार गावचा सरपंच ? अनेक ठिकाणी उत्सुकता शिगेला .



संदीप जाधव / आयुब मोमिन ( उपसंपादक ) -


राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अवघ्या दोन दिवसांवरच ही निवडणूक येऊन ठेपली आहे. ठिकठिकाणी उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण ७ हजार ६८२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. १८ डिसेंबरला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, २० डिसेंबरला गावचा कारभारी कोण हे ठरणार आहे. त्यामुळे गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे  तर अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत प्रचार शिगेला लागल्याचे चित्र आपल्याला पहायवास मिळत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असुन मतदारांच्या कानांना आराम मिळाला आहे . आज आणि उद्या अनेक ठिकांणी आर्थिक प्रलोभने दाखवण्यात येतील  असा अंदाज राजकिय अभ्यासक व्यक्त करत आहेत . गुप्त बैठका सुरु आहेत . मतांची गोळा बेरीज , फोडा फोडी विरोधकांना प्रलोभने आदी युक्त्यांचा प्रभावी वापर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . वरीष्ठ पातळी वरील नेते ही गावोगावच्या ग्रामपंचायतीत डोकावुन पाहत आहेत .   आपल्या चिन्हाचे बटन दाबायला प्रवृत्त करणारे ग्रुप गावागावात सक्रिय झाले आहेत . निवडणूकांसाठी लाखोंचा खर्च करणारे  जनतेने प्रलोभनांना बळी न पडता निर्भीडपणे योग्य उमेदवारांनाच मतदान करून गावच्या विकासाची संधी द्यावी निवडून दिलेला उमेदवार जर भ्रष्ट कारभार करू लागला तर त्याला जाब विचारायची हिंमत मतदारात पाहिजे .   त्यामुळे मतदारांनी कुणाचेही मिंधे होऊ नये व आपल्या गावच्या विकासासाठी योग्य गाव कारभारी निवडावा जो जनतेचा सेवक बनुन काम करेल .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.