जिजाऊ ब्रिगेडच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी सुवर्णा गिर्हे यांची निवड
धामणगाव प्रतिनिधी. दादा पवळ
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडची मराठवाडा विभागाची महत्वपूर्ण बैठक बीड येथे नुकतीच संपन्न झाली असून यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या आष्टी तालुका अध्यक्ष म्हणून शिवमती सौ सुवर्णा बाळासाहेब गिर्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या महत्वपूर्ण निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
सुवर्णा बाळासाहेब गिर्हे यांचे अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात मोठे सामाजिक कार्य आहे त्यांनी समाजातील महिलांचे संघटन केले असून समाज कार्याची आवड आहे त्या मराठा समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत कार्यरत असतात याच कार्याची दखल घेत त्यांची जिजाऊ ब्रिगेडच्या आष्टी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांनी वरीष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत तसेच दिलेली जबाबदारी स्विकारुन महिलांच्या व समाजाच्या हितासाठी काम करुन लवकरच महिला संघटीत करुन तालुक्यात जिजाऊ ब्रिगेड घराघरात पोहोचेल यासाठी प्रयत्न करणार आहे सुवर्णा गिर्हे यांना जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरी भदाने व शिवमती स्नेहा खेडेकर यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल शिवमती सुवर्णा गिर्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
stay connected