लीना देगलूरकर यांचा कवीसंमेलन,पुरस्कार वितरण कार्यक्रम थाटामाटात संपन्न

 लीना देगलूरकर यांचा कवीसंमेलन,पुरस्कार वितरण कार्यक्रम थाटामाटात संपन्न



आम्रपाली धेंडे


दि.12 डिसेंबर 2022 रोजी बारामती येथे सकाळच्या वेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली . पालखी फुलांनी छान सजवली होती . सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसून येत होते . अध्यक्ष किशोरकुमार मिश्रा गजल मुशायरा अध्यक्ष ..डॉ.राज रणधीर कवी संमेलन अध्यक्ष .डॉ.राजाभाऊ धर्माधिकारी 

          कल्पना शिंदे ,सुनील ससाणे,विनिता कदम ,भावना काळे यांनी उत्तम असे परिश्रम घेतले . किशोर कुमार मिश्रा सर, किरण गुजर सर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम नटराज कलादालन या ठिकाणी होता . उदघाटन  किरण गुजर यांनी केले पौर्णिमा तावरे यांनी कार्यक्रमास उपस्थित दर्शवली . किरण गुजर सरांनी विशेष असे सहकार्य केले . अलका रसाळ , डॉ.राजा धर्माधिकारी सर यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले . लीना देगलूरकर मॅडम यांनी अप्रतिम असे काव्य सादर करून सर्वांची मने जिंकली . लीना मॅडमच्यात खूप मोठी जिद्द , धडपड आणि सर्वांसाठी प्रेम दिसून आले . त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी शिकले पाहिजे . डॉ.राजेंद्र केंगर, श्री निवास गडकरी , डॉ.श्रद्धा जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. येणाऱ्या प्रत्येक कवयित्री, कवीचा सन्मान करून त्यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली गझल कार्यक्रम सुंदर होऊन कवितेची स्पर्धा घेण्यात आली . अनेक कवयित्री , कवी यांनी उत्तम असे सादरीकरण केले त्याएकी आम्रपाली धेंडे, मेहमुदा शेख , सुवर्णा पवार , विजय माने ,दिपाली घाडगे .  आत्माराम जाधव,साईनाथ फुसे यांनी उत्तम प्रकारे गझल सादर केली

       लीना देगलूरकर मॅडम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.