आज ग्रामपंचायत साठी होणार मतदान
आष्टी तालुक्यातील 105 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून आज रविवारी सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सेट केले असून सर्व मतदान केंद्रावरती अधिकारी कर्मचारी व मतदान यंत्र बसद्वारे सायंकाळी पोहोच होतील प्रत्येक मतदान केंद्रावरची व्यवस्था चोख करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नेमलेले असून केंद्र अध्यक्ष 392, मत अधिकारी क्र 1 392,मत अधिकारी क्र 392, मत अधिकारी क्र 3 392, झोनल अधिकारी 31 तहसिलदार कर्मचारी 120 ते140, निवडणूक निर्णय अधिकारी 40, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 40 असे एकूण 1568 अधिकारी कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.तालुक्यातील 105 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी 298 तर 1 हजार 966 सदस्यांसाठी उमेदवार उभे आहेत. एकुण 356 मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पडत आहे.1 लाख 77 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
stay connected