देवळाली गावच्या सरपंचपदी अरुणाबाई शेकडे तर उपसरपंचपदी राजेंद्र पवार यांची निवड
आष्टी प्रतिनिधी
देवळाली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार अरुणाबाई पोपट शेकडे या लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या असून याच पॅनलचे 11 पैकी आठ ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने उपसरपंचपदी लोखंडवाडी येथील युवा नेते राजेंद्र हौसराव पवार यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील देवळाली पानांची ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल प्रमुख पत्रकार शरद तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार अरुणाबाई पोपट शेकडे व आठ सदस्य बहुमताने निवडून आले आहेत ,काल झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत युवा नेते राजेंद्र पवार यांची अविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच पती पोपट शेकडे म्हणाले की देवळाली गावाचा विकासाचा अनुशेष येत्या पाच वर्षात भरून काढण्यात येईल सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने जाणून घेऊन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून सर्वांना बरोबर घेऊन गावातील विकास कामे करण्यात येणार आहेत राजकारण बाजूला ठेवून गावातील जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे काम भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्व सहकारी करणार असल्याचे यावेळी शेकडे यांनी सांगितले, सरपंच उपसरपंच निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पॅनल प्रमुख शरद तळेकर एडवोकेट महादेव तांदळे माजी सरपंच नवनाथ तांदळे माजी सरपंच हरिभाऊ तांदळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुरलीधर शेकडे पोपट आबा शेकडे अमोल तळेकर कृष्णा तांदळे शैलेश मोहिते दिलीप तांदळे बबन रांजणे अनिल मोहिते दीपक पवार रमेश पवार ज्ञानेश्वर तांदळे आजिनाथ थोरात राजेंद्र आमले रमेश खाडे शहाजी देशमाने विठ्ठल हिंगणे काका कटके निलेश पवार बापू साळवे राजेंद्र तांदळे कृष्णा शेकडे विजय आमले भाऊ मोहिते दीपक जगदाळे अमोल रांजणे हरिभाऊ हिंगणे दत्तोबा रांजणे रामदास जगदाळे भाऊ देशमाने,यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
stay connected