रेन्यू पॉवर प्रा.लि कंपनीतर्फे बांदखेल येथे विधवा, निराधार, विद्यार्थी, दुर्लक्ष घटकांना ब्लँकेट वाटप.
बांदखेल - आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथे, ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या, रेन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सामाजिक दायित्व अर्थात सी.एस.आर निधीतून, गुरुवार 30 डिसेंबर रोजी बांदखेल येथे थंडीच्या हुरहूडीपासून बचाव करण्यासाठी बांदखेल मधील विधवा, निराधार महिला, ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक , समाजातील दुर्लक्ष घटक, गोरगरीब कुटूंब आदींना रेन्यू पॉवर कंपनीच्या वतीने उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले.
ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत, सामाजिक क्षेत्रातही आपल योगदान देत आहे. ग्रामीण गाव -खेड्यांत कार्यक्षेत्र असलेल्या, रेन्यू पॉवर प्रा.लि कंपनीच्या वतीने आतापर्यंत अनाथ आश्रम शाळा , वसतिगृहामधील गरजू विदयार्थी अधिसह, गहुखेल ,कारखेल, देऊळगाव घाट, वेलतुरी, आरणविहिरा, चिंचेवाडी, शेडाळा, टाकळी काझी आधी गावातील गोर गरीब नागरिकांनाही ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे .
- तेजवार्ता प्रतिनिधी. अर्जुन थोरात बांदखेल
stay connected