वंचितांच्या विकासाची तळमळ राजर्षी शाहूग्रामीण विकास प्रकल्पाच्या धमन्यातूनवाहते ! – डॉ. विलास सोनवणे
आष्टी (प्रतिनिधी) :-
तळागाळातील वंचित शोषितांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. प्रत्येक माणसात, प्रत्येक मुला-मुलीत खूप काही करण्याची उर्मी व जिद्द असते. वंचित – शोषितांच्या उर्मिला व जिद्दीला साथ देणारी कोणी व्यक्ती व संस्था भेटली तर ती व्यक्ती, तो मुलगा, ती मुलगी खूप उंच झेप घेऊ शकते. अॅड. वाल्मीक (तात्या) निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाच्या अध्यक्ष, सचिव विश्वस्त रुपी धमन्यांतून विकासाची तळमळ वाहते असे मौलिक गौरवोद्गार आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुप्रसिद्ध डॉक्टर विलास सोनवणे यांनी काढले. राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी या स्वयंसेवी संस्थे आयोजित केलेल्या बालक – पालक मेळावा व कोविड योद्धे सन्मान कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी विचार मांडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टाईम्स ऑफ इंडिया सी.एस.आर. व टीच इंडिया च्या वेस्टर्न साऊथ रिजन मुंबई चे प्रमुख अनिल जेम्स, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा चे संचालक व गांधी हॉस्पिटल चे संचालक डॉ. उमेश गांधी, गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जिओलॉजिस्ट व जिओ साईंटीस्ट निखील बनसोडे व रितेश कुमार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. वाल्मिक (तात्या) निकाळजे हे होते.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. विलास सोनवणे म्हणाले की, राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प आष्टी या संस्थेचे सर्व विश्वस्त ज्ञानवंत, गुणवंत असून त्यांच्या ठायी समाजाच्या सर्वांगीण विकासाची उर्मी खच्चून भरलेली आहे. संस्थेने वंचित मुला – मुलींच्या शिक्षण व समक्षीकरणासाठी “प्रगतीचे आकाश भेदणारे स्फूर्तीपंख” हा प्रकल्प सुरु केल्याबद्दल व वंचित – शोषित समूहातील मुला – मुलींच्या कला – क्रीडा गुणांना आणि बुद्धी कौशल्याला अधिक वाव मिळण्यासाठी व प्रगतीची अत्युच्च भरारी घेण्यासाठी गावागावातून जो उपक्रम सुरु केला आहे त्यामुळे कलेच्या क्षेत्रासह ऑलीम्पीक, कॉमनवेल्थ व एशियाड सारख्या विविध जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी होऊ शकते. इतके महत्वाचे व मोठे कार्य राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प ही संस्थे करीत आहे.
यावेळी डॉ. उमेश गांधी म्हणाले की, कोरोनाचा पहिला व दुसरा टप्पा खूप भयावह व कठीण होता. कोरोन योद्धांनी जीवावर उदार होऊन अहोरात्र केलेल्या परिश्रमामुळे आणि राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाच्या अन्नधान्य, किराणा, सॅनीटायझर व मास्क वाटपामुळे कोरोनाच्या भयानक संकटावर मात करण्याची वंचितांना शक्ती मिळाली. त्यांना सलाम आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे म्हणाले की, राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाची वंचित विकास सेवा, आरोग्य सेवा, आधार व मार्गदर्शन यामुळे समाजाची जडणघडण झाली आहे. संस्थेच्या समाजसेवेत आमचा खारीचा वाटा देण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न राहील. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाच्या अनौपचारीक शिक्षण केंद्रावरील कामाचा व शिक्षण क्षेत्रातील योगदान हे अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या नागपूर रिजनचे जिओलॉजिस्ट व जिओसाईंटीस्ट निखील बन्सोडे व रितेश कुमार यांनी सांगितले की, मानवी हक्क चळवळीत अॅड. वाल्मिक (तात्या) निकाळजे यांचे भारत भर मोठे नाव व काम आहे. त्यांच्या संस्थेचे काम त्यांच्या होम एरियात पाहण्याचे आज भाग्य लाभले. त्यांच्या कार्यास जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ऍड. वाल्मिक निकाळजे यांनी सांगितले की समाजातील दलित आदिवासी व भटके विमुक्त समाजाच्या मुलामुलींनी पारंपरिक व्यवसायात जाऊ नये व त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन देशाचे उच्च पदस्त अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, न्यायाधीश आणि सत्ताधारी असे उज्वल नागरिक बनावे यासाठी संस्था सातत्याने कार्य करीत असून या कार्यासाठी व्होलकार्ट फौंडेशन इंडियन ट्रस्ट व समाजातील जाणकार लोक मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करीत आहे. शिक्षण व आरोग्याच्या गुणवत्ता वाढीसाठी जमीन पाणी व पर्यावरणाच्या सुधारणारनेसाठी संस्था कायम प्रयत्न करीत असून अन्याय-अत्याचार व लैंगिक शोषण या विरुद्ध संस्था सातत्याने सनदशीर मार्गाने लढत आहे. विषयांवर समाजाने गंभीर व्हावे असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी संस्थेतर्फे चालणाऱ्या “स्फुर्तीपंख” या अनौपचारीक शिक्षण व सक्षमीकरणासाठी चालवल्या जाणाऱ्या विविध गावातील केंद्रातील मुला - मुलींच्या गायन स्पर्धा, नकला (अभिनय) स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यात अनेक मुलामुलींनी सहभागी होऊन गायन, नृत्य, अभिनय व वकृत्व केले. राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पाच्या व बालक – पालक मेळाव्यातून त्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळाले.
याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय आष्टी च्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता कोविड योद्धे म्हणून अविरत, अद्वितीय व उल्लेखनीय अशी अहोरात्र अथकपणे सेवा केली. त्याबद्दल डॉ. संतोष जावळे, डॉ. अमित डोके, डॉ. रामदास मोराळे, परिसेविका मिरा पोटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुपाली पवार, कक्ष सेवक तुकाराम लाड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नागेश करांडे, औषध निर्माण अधिकारी संदीपान धस, आरोग्य मित्र उमेश जिबकाटे, रुग्णवाहिका चालक किशोर रामचंद्र निकाळजे, आरोग्य स्वयंसेवक ओंकार बुरांडे, हरी बेदरे, विशाल माने व ऑन लाईन नेटवर्क तात्काळ सेवा देणारे कृष्णा गंभिरे आणि राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्पामार्फत कोविड लॉकडाऊन काळातील जोखमीच्या रिलीफ वर्कमध्ये अमूल्य योगदान देणारे निखिल शिंदे, अविनाश वसंत निकाळजे, सागर जालिंदर निकाळजे, आकाश मोरे, अक्षय विजय निकाळजे व स्वप्नील नवनाथ साळवे या कोविड योद्धांचासंस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन व फेटा बांधून आणि शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान, सत्कार व गौरव करण्यात आला. तसेच गायन अभिनय, नृत्य व वकृत्व स्पर्धेत प्राविण्य मिळविणारे – गायन स्पर्धा – प्रथम – सायली साबळे व तेजल साबळे, द्वितीय – ओम कानडे, तृतीय – आराहन राजू शेख उत्तेजनार्थ – विवेक माने, समूह नृत्य स्पर्धा – प्रथम – पृथ्वीराज नामदेव थोरात, कय्युम कदीर शेख, अरहान राजू शेख, कु. सादिया कदीर शेख, द्वितीय - कु. सानिका भवर, कु. अस्मिता भवर, तृतीय – कु. लक्ष्मी धोत्रे, कु. प्रिया सुरवसे, उत्तेजनार्थ – कु. ऋतुजा धोत्रे, कु. देविका सतीश यादव, कु. लावण्या सावकार कानडे, कु. रोहिणी भास्कर गर्जे, कु. स्नेहल रामेश्वर पिंपळे, दीक्षा मुकेश कानडे, व्यक्तिगत नृत्य स्पर्धा – प्रथम – महेश विष्णू मंडळे, द्वितीय – लक्ष्मी धोत्रे, पथनाट्य स्पर्धा – प्रथम – ओम गजानन कानादेव निखिल नानाजी भिसे, द्वितीय – अमर तानाजी यादव, तृतीय – आतिश भाऊसाहेब यादव, सिद्धांत गोविंद गोंडे, उत्तेजनार्थ – निसर्ग हनुमंत भिसे यांनी प्राविण्य मिळवले व बक्षिसे पटकावली. सर्व सहभागी स्पर्धक मुलामुलींना प्रशस्तीपत्रे देऊन पुष्प देऊन गौरविण्यात आले. कु. पायल माळी, कु. जानवी माळी, गणेश माळी, जयदीप माळी व कु. छाया माळी यांनी रंगरूप आले या नगरा हे अत्यंत सुंदर व उत्कृष्ट स्वागत गीत सादर केले. स्पर्धेचे सन्माननीय परीक्षक म्हणून गणेश विद्यालयाचे शिक्षक व संगीत विशारद मोहन ठोंबरे सर, इंदिरा कन्या विद्यालय धामणगांव चे शिक्षक व गायक मिलिंद निकाळजे सर आणि जि. प. डोईठाण केंद्राच्या केंद्र प्रमुख आम्रपाली सावंत मॅडम यांनी महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली व स्पर्धेचे निकाल जाहिर केले. या स्पर्धेत तबला वादक संजय ससाणे सर, हार्मोनियम वादक अमोल सुखदेव निकाळजे, व ढोलकी वादक – किशोर निकाळजे यांनी सन्माननीय वादक म्हणून सुंदर साथ संगत दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचलन जि. प. कें. प्रा. शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संजय दहातोंडे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अॅड. प्रबोधन (दादा) निकाळजे यांनी केले व सर्वांचे आभार संस्थेचे विश्वस्त अॅड. सतीशकुमार गायकवाड नोटरी भारत सरकार यांनी मानले. या कार्यक्रमास सुमारे 250 मुला – मुलींसह संस्थेचे कोषाध्यक्ष संजय गायकवाड, संस्थेच्या विश्वस्त फुलावती निकाळजे, अशोक निकाळजे, दामोदर थोरात, सय्यद अली पहेलवान, सय्यद वजीर, तसेच शोभा निकाळजे, तात्याभाऊ सुरवसे, केशरबाई सुरवसे, बाबासाहेब जगताप, बाबासाहेब धोत्रे, तुषार जगताप, रोहीत धोत्रे, देवगुण भोसले, तुकाराम काळे, कांता काळे, देऊबाई काळे, भीमराव सोनवणे (मुंबई), बंटी यादव, शौकत सय्यद, सुहास पगारे, अनिल थोरात, प्रतीक पवार, अमोल खवळे, यशवंत सदाफुले, ताराबाई भोसले, रेणुका भोसले, मोहन भोसले, संगीता भोसले, रेखा भोसले इ. सह अनेक मान्यवर अपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल वाल्हेकर, अमोल धोत्रे, किरण जगताप, प्रवीण यादव, राहुल धोत्रे इत्यादींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला.
stay connected