भयमुक्त वातावरणात ग्रामपंचायत निवडणुका पार पाडाव्यात.... सुरेश पाटोळे

 भयमुक्त वातावरणात ग्रामपंचायत निवडणुका पार पाडाव्यात.... सुरेश पाटोळे



पाटोदा (प्रतिनिधी)

      तालुक्यात सध्या ३४ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायत बिनविरोध झालेले आहेत. तसेच ज्या ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकल्या नाहीत त्याठिकाणी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. सर्वसामान्य गरीब व्यक्तींना अनेक कारणाने त्रास होत असून ते मतदान करतील का नाही. अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी पाटोदा तालुक्याचे इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर रामचंद्र पवार यांची भेट घेऊन सेन्सिटिव्ह गावात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात यावा. जेणेकरून सर्व सामान्य मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता येईल.

      सुरेश पाटोळे यांनी पाटोदा तालुक्यातील सर्व गावांना भेटी देऊन तेथील मतदारांच्या भेटी घेऊन त्याच्या मनातील शंका व नाराजी असल्याचे जाणवले असुन अनेक गावगुंड व जुनेजाणते पुढारी यांच्या भीतीपोटी व दडशाहीमुळे गरीब मतदार मतदान करेल की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या महोत्सवात सर्वांना सामावून घेण्यासंदर्भात गावोगावी जाऊन शांतता बैठका घेण्यात याव्यात व या बैठकीत सर्वांनी आनंदाने व बहुसंख्येने मतदान करावे असे आश्वासन गावकऱ्यांना द्यावें अशी विनंतीही सुरेश पाटोळे यांनी बोलतांना केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.