कृष्णा साळवे याने राहत्या घरीच गळफास लावून केली आत्महत्या .
आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथील उसतोडणी कामगार परमेश्वर साळवे यांच्या मुलगा कृष्णा परमेश्वर साळवे वय वर्षे सोळा हा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय बीड सांगवी येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता . अत्यंत गरीब कुटुंबातील ऊसतोड मजुरांच्या तो मुलगा आहे .अत्यंत गरीब शांत संयमी स्वभाव आसणारा भैय्या म्हणून सुपरिचीत होता . तो १३ डिसेबर ला सहल मध्ये गेला होता . पहाटे चार वाजता सहिल घरी होता . नंतर दहा वाजता राहत्या घरात साडी च्या साह्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली अतिशय दुखद वातावरणात सायंकाळी ५ वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी मा सरपंच बबनराव करांडे नंदकिशोर करांडे संजय डुकरे कमेलश नरवडे बापुराव नरोडे संपत ढोबळे बांबु पाणताणे अमोल करांडे संदिप मस्के दिपक मस्के तसेच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते . आमदार माननीय श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास साळवे यांचा भाऊ होता . त्याचा पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे .
stay connected