🚔🚨 *पो.स्टे.अंभोरा चे आवाहन* 🚨🚔*सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक - 2022*
पोलीस स्टेशन अंभोरा हद्दीतील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिस्थिती निर्माण केल्यास तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होईन असे वर्तन केल्यास त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येईल कोनाचीही गय केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
त्याच प्रमाणे सोशल मिडीयावर सुध्दा बीड सायबर पोलीसांची कटाक्षाने नजर असुन कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट/संदेश निर्मित करणे, प्रसारित किंवा पुढे पाठवणे टाळावे अशा प्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवरं तात्काळ प्रचलित कायदान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षण घेणारे तरूण युवकांनी यामध्ये सक्रिय होतांना कोणत्याही भुलथापाना व प्रलोभनास बळी पडु नये. ते स्थानिक पातळीवर कोणत्याही अनुचित प्रकारामध्ये किंवा आचार संहितेचे उल्लंघन होईन असे वर्तन करू नये. ज्यामुळे त्यांचे वर गुन्हे दाखल होवुन,पोलीस रेकॉर्ड बनेल कारण दाखल गुन्हयाची माहिती ही चारित्र्य प्रमाणपत्रावर नोंद होत असल्याने भविष्यातील उज्जवल व चांगल्या संधीस युवकांना मुकावे लागेल याबाबत पालकांनी पण कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे निवडणुक काळात युवकांनी जबाबदारीने वागने अत्यंत आवश्यक आहे.
पोलीस स्टेशन अंभोरा हद्दीतील ग्रा.पं. निवडणुकीच्या दृष्टीने हद्दीतील सर्व गावात शांतता राखणे,लोकशाहीच्या मार्गाने मतदान प्रक्रिया पूर्ण करने,सर्व आचार संहितेचे नियमांचे पालन करणे हे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीसांना आणि महसूल विभागास माहिती द्यावी.
सर्व उमेदवार आणि नागरिकांनी आचार संहितेच्या नियमांचे पालन करावे...
🚨🚔🚨🚔🚨🚔
*रोहित गंगाधरराव बेंबरे,*
सहा.पोलीस निरीक्षक
प्रभारी पो.स्टे. अंभोरा
stay connected