*प्रेम असं असावं*
*तु हळुच माझ्याकडे बघावं,
मी बघताच तु हळुच लाजावं.
प्रेम असंच असावं..!!
नाराज कधी झालीस माझ्यावर,
तु मुद्दाम रुसावं,
तुला मनवण्यासाठी मी,
सुंदरस चॉकलेट द्यावं.
प्रेम असंच असावं...!!
बर्फाच्या थंडीमध्ये,
तुझ्या मिठीत लपावं,
तुझं माझं प्रेम,
जन्मोजन्मी असच राहावं.
प्रेम असंच असावं......!!
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगल्या सारखं घडावं,
माझ्या ह्रदयाच्या ठोक्याला,
फक्त तुझंच नावं निघावं.
प्रेम असंच असावं........,!!
लेखक :- प्रफुल्ल धाकडे..
stay connected