पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन धनराज साखरे यांना राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार जाहीर
___
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तसेच संघर्ष पत्रकार संघाचे उपाध्यक्ष केज यांना सहारा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रातील तसेच शेतकऱ्या विषयक विविध लढ्यातील विविध अनोख्या लक्ष्यवेधी आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक कार्याबद्दल "राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार "जाहीर झाला असून दि. ५ जानेवारी गुरूवार रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
दि.०५ जानेवारी २३ गुरूवार रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मेअर हाॅल जुहु लाईन अंधेरी वेस्ट मुंबई येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून दिलीप सेन सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार मुंबई यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्ष आरूणजी मराठे प्रमुख पाहुणे म्हणून अली खान,संजय खापरे,हिरेन वैद्य,दिपा चाफेकर,सुरेश हिवराळे आदि मंडळी उपस्थित राहणार आहेत.संस्थापक अध्यक्ष सहारा फाउंडेशन दिग्दर्शक संविधान एक रस्ता यांच्या संकल्पनेतून दरवर्षी महिलाविषयी कौतुकास्पद उपक्रम राबवणा-या तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक,पत्रकारिता,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या या पुरस्काराने गौरविण्यात येते.
पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन धनराज साखरे यांचे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे
stay connected