शिरापूर येथे ट्रॅक्टर चालकाचा रोडवर आदळून मृत्यू
आष्टी-शिरापूर गावातुन टॅक्टर घेऊन कड्याकडे जात असताना खड्यात आदळल्याने तरूण चालकांचा जागीच मुत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री शिरापूर येथे घडली आहे. अक्षय भाऊसाहेब सांगळे रा. कडा असे मयत तरुणांचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील अक्षय भाऊसाहेब सांगळे वय २४ रा. कडा हा तरूण शुक्रवारी रात्री शिरापूर येथुन कड्याकडे टॅक्टर घेऊन जात असताना शिरापूर येथेच रोडवरील एका खड्ड्यात ट्रॅक्टर जोरात आदळल्याने चालकांचा स्टेअरिंग वरिल ताबा सुटुन तो रोडवर पडला यात त्याचा जागीच मुत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेहावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.शोकाकुल वातावरणात कडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अवैध वाळु वाहतूकीच्या बळीची चर्चा शिरापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून नदीपात्रातून अवैध वाळु उपासा करून त्याची खुलेआम रात्री अपरात्री वाहतूक केली जात असल्याचे बोलले जात असुन हा वाळु वाहतूकीचा बळी असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
stay connected