आज संतोषी मातेची यात्रा

 आज संतोषी मातेची यात्रा






आष्टी तालुक्यातील धानोरा येथील संतोषी मातेच्या यात्रेस आज दि. ३१ डिसेंबर रोजी सुरुवात झाली . आज रात्री भव्य पालखी मिरवणूक निघणार असून या प्रसंगी विवीध नामांकीत वाद्यवृंद व बँण्ड पथकांच्या गजरात पालखी मिरवणूक निघते . मिरवणूक प्रसंगी मोठ्या प्रमाणात शोभेची दारू उडवण्यात येते . फटाक्यांच्या आतषबाजीने व विद्युत दिव्यांच्या लखलखाटात मंदीर परिसर उजळून निघतो . नगर - जामखेड रस्त्यालगत हे भव्य मंदीर असुन यात्रेसाठी संपुर्ण तालुक्यातुन तसेच महाराष्ट्रातील विवीध भागातुन भाविक भक्त दर्शना साठी हजेरी लावतात . तसेच दि १ जानेवारी रोजी दिवसभर दर्शना साठी भाविक येथे गर्दी करतात . यात्रे प्रसंगी उपस्थित राहुन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटी मार्फत करण्यात आले आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.