कडा येथे जागतीक दिव्यांग दिन साजरा ----------------------------------

 कडा येथे जागतीक दिव्यांग दिन साजरा
----------------------------------

आष्टी/ प्रतिनिधी


आष्टी तालुक्यातील कडा येथे आज सकाळी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

यंदा महाराष्ट्र शासनाने दिव्यागांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याच्या आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या मागणीची दखल घेत दिव्यांग कल्याण विभाग- दिव्यांग मंत्रालय ३डिंसेबर २०२२ पासून कार्यान्वित होईल.

अशी घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य हे दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहीले राज्य ठरले आहे.

दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभपणे पोहचविण्यासाठी या विभागाची मदत होणार आहे.याचा आनंद म्हणून व जागतीक दिव्यांग दिन कडा येथील सर्व दिव्यांग प्रेमींना पेढे वाटुन, फटाके फोडुन व आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या नावाचा जयजयकार करत मोठ्या उत्साहात कडा येथे साजरा केला.

  यंदाचा ३ डिसें २०२२ हा जागतिक दिव्यांग दिन आपण सर्व दिव्यांग विशेष उत्साहात आनंदात एक चैतन्य दिन म्हणून साजरा करूयात. नवीन दीव्यांग मंत्रालय घोषणेसाठी महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या न्याय | हक्कासाठी देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात येत्या ३ डिसेंबर पासून होत असून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ची मागणी पूर्ण होत आहे. दिव्यांगाचे कैवारी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले दिव्यांगांना त्यांचा न्याय | मिळावा शासनाच्या सर्व सुविधा योजना पासून कोणीही दुर्लक्षित राहू नये, त्यांच्या समस्या एका छत्राखाली मार्गी लागाव्यात यासाठी या स्वतंत्र दिव्यांग विभाग होत आहे. यावेळी दिव्यांग तालुका सचिव राजकुमार थेटे, सामाजिक कार्यकर्ते रहेमानभाई सय्यद,सुभाष चौधरी,दत्ता खिलारे सुनिल सुपेकर, मारुती कदम, तात्यासाहेब राऊत, प्रफुल्ल कुमार मुथ्था, वैभव क्षिरसागर,वायरमण काळे,अबुजर मोमीन,राम सोनावळे,दत्ता शिंदे, घोडके मामा,वाहीद शेख,देवकर, शास्त्री,कर्डिले,आदी सर्व दिव्यांग प्रेमीं उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.